CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
icats
DOWNLOADS
CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
marathi-text
DOWNLOADS
Nilaya ICATS येथे सी.ए. निलय मेहता ह्यांचा वाढदिवस!

आपला जन्मदिवस हा आपल्यासाठी खरंच एक वेगळी अनुभूती देणारा एक आनंदी दिवस असतो, आणि हाच दिवस जर आपल्या प्रियजनांसोबत साजरा करायची संधी मिळाली तर मग एक आनंदाची पर्वणीच ठरते.

१९ फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती आणि ह्याच दिवशी आमच्या संस्थेचे founder आणि CEO सी.ए. निलय मेहता म्हणजेच आपले लाडके निलय सर ह्यांचा जन्मदिवस संपूर्ण संस्थेतल्या लोकांनी म्हणजेच विद्यार्थी, टीचर व स्टाफ ने मोठ्या उत्साहात साजरा केला. ह्या मंडळींचा उत्साह आणि प्रेम पाहून स्वतः निलय सर सुद्धा भारावून गेले आणि त्यांनी ह्या वेळेस सुद्धा नेहमीप्रमाणे आपल्या जवळच्या लोकांना प्रेरणादायी विचार मांडले आणि ते विचार आज आम्ही तुमच्यासाठी शब्दांकित करत आहोत.

Posted by Nilay Mehta on Tuesday, 20 February 2018

 

दिवसाची सुरुवात अतिशय सुंदर अश्या कार्यक्रमाने झाली, सरांच्या वाढदिवसा निमित्त संपूर्ण वास्तूत फुलांची रांगोळी व फुग्यंची सजावट करण्यात आली होती. हा सरांचा ४० वा वाढदिवस असल्यामुळे , सकाळी त्यांचे आगमन होताच ४० विद्यार्थांनी त्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. आपल्या परंपरेला साजेसे आसे औक्षण सरांना केले गेले.असे प्रसंग आजकाल आपल्या आयुष्यात खूप कमी वेळा येतात जेव्हा आपण आपली परंपरा अनुभवतो, पण Nilaya ICATS Institute of Commerce येथे आम्ही हीच परंपरा जपण्याचे संस्कार देत असतो.

औक्षण कार्यक्रमानंतर सरांनी sacred lessons च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संबोधित केले. आपला जीवनपट जणू त्यांच्या समोर उघडा केला याच बरोबर निलय सरांनी प्रेरणादायी गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले कारण हा सुद्धा येथील sacred lessons मधील एक अविभाज्य भाग आहे, ह्या गाण्यांनी एकाग्रता तसेच उत्साह निर्माण करण्यासाठी प्रेरणा मिळते.

सर्व लोकांचा उत्साह पाहून भारावून गेलेल्या निलय सरांना शब्द सुचत नव्हते पण तरीही त्यांनी विद्यार्थ्यांना आणि इतर उपस्थितांना उद्देशून एका महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकला तो म्हणजे आयुष्यात ध्येयनिश्चिती कशी करावी. होय, निलय सर नेहमीच विद्यार्थ्यांना त्यांच्या sacred lessons द्वारे अश्या आशयाचे मार्गदर्शन देत असतात जे Nilaya ग्रुप चे वैशिष्ट्य म्हणता येईल. इतर कोणत्याही क्लास मध्ये किंवा institute मध्ये तुम्हाला असे मार्गदर्शन मिळणे अशक्य आहे.

ह्या नंतर एका मागून एक अशा असंख्य विद्यार्थांनी सरांसाठीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या व कृतज्ञतापूर्वक शुभेच्छा दिल्या. मोहित सर आणि गौरी मॅडम यांनी देखील आपल्या जीवनातील ह्या गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आशीर्वाद घेतले.विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील विचार मांडले, प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या कारणाने Nilaya ICATS Institute of Commerce तसेच निलय सरांच्या शिकवणुकीने समाधानी असतो पण अश्या कार्यक्रमाद्वारे ते आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकतात.

आमच्या येथील गुणी विद्यार्थी निखील तसेच उज्वलने देखील आपले विचार मांडले. निखिलने त्याच्या ICATS येथील पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत मिळालेल्या अनुभवाची मनापासून दाद दिली तसेच उज्वलने सरांसाठी एक उत्तम असे हिंदी गाणे म्हणले जे त्याने स्वतः रचले होते, निलय सरांसाठी विद्यार्थ्यांकडून आलेल्या ह्या भावना म्हणजेच त्यांच्या अखंड कार्याची पोचपावती असते.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थी सरांचे आशीर्वाद घेण्यात व सरांसोबत सेल्फी काढून हा आनंद सोहळा कॅमेरा बरोबर मनात छायांकित करून घेण्यात मग्न झाले आणि सर सुद्धा हे क्षण अक्षरशः एन्जॉय करत होते.

आज गेली अनेक वर्षे आम्ही Nilaya ICATS Institute of Commerce येथे वाढदिवस तसेच असे अनेक कार्यक्रम आम्ही साजरे करतो जेणेकरून सर्वांनाच एकत्र येण्याची संधी मिळते आणि त्यातूनच वैयक्तिक भावनांना वाट मोकळी करून देण्यास वाव मिळतो. अश्या सुंदर पद्धतीने वाढदिवस साजरा केल्यामुळे आपल्या परंपरा तसेच संस्कारांचा पाया रचला जातो ज्यामुळे आपल्यातील चांगला माणूस बाहेर येण्यास मदत होते जे ह्या जगात खूप महत्वाचे आहे. कॉमर्स क्षेत्रातील ज्ञानासोबतच अश्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरे केलेले अनेक कार्यक्रम विद्यार्थ्यांना आयुष्यभर लक्षात राहतात आणि हेच Nilaya ICATS Institute of Commerce च्या कार्यासाठी प्रेरणा आहेत.