CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
icats
DOWNLOADS
CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
marathi-text
DOWNLOADS
होय, तूच आहेस एक्स्ट्रा-ऑर्डिनरी.

बऱ्याच वेळा आपण काही सरकारी किंवा खाजगी संस्थांच्या सार्वजनिक कार्यक्रमात पाहतो की बऱ्याच नामांकित व्यक्ती आपले विचार मांडत असतात, त्यांच्या बोलण्यातून कायम एक वेगळीच झलक आपल्याला दिसून येते. बऱ्याच वेळा आपल्याला हे देखील दिसून येते की ह्या व्यक्ती त्यांच्या तरुणपणी खूपच साधारण व्यक्ती होत्या पण त्यांच्यातल्या काही विशेष गुणांमुळे म्हणा किंवा त्यांच्या मेहनतीमुळे ते आज त्या स्थाना पर्यंत पोहोचलेल्या असतात.

ह्या लोकांच्या बोलण्या-वागण्यातून आपल्याला प्रेरणा मिळते, काहीतरी वेगळं करून दाखविण्याची किंवा त्यांच्यासारखे बनून दाखविण्याची एक धमक मिळते, आपल्याला ह्या लोकांकडून प्रेरणा मिळते कारण हे लोक असतात एक्स्ट्रा-ऑर्डीनरी. पण एक्स्ट्रा-ऑर्डीनरी असं नुसतं बोलून होता येत नाही, त्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात तसेच आपल्या मधल्या काही सद्गुणांची पारख करावी लागते तसेच काही चांगल्या गोष्टी अंगिकाराव्या लागतात. तर मग पाहूया कि कसे बरे होता येईल एक्स्ट्रा-ऑर्डीनरी?

एक्स्ट्रा-ऑर्डीनरी बनण्याआधी आपण आज पाहूया एक प्रेरणादायी उदाहरण, खूप लोकांना कैलाश काटकर हि व्यक्ती माहिती नाहीत पण Quick Heal सर्वांनाच माहित आहे. ते २२ वर्षापूर्वी पुणे येथे एका रिपेयरिंगच्या दुकानात कामाला होते, पण आज २२ वर्षानंतर वार्षिक १८६ करोड उलाढाल असणाऱ्या Quick Heal कंपनीचे ते मालक आहेत. त्यांनी १९९० साली खूप कमी भांडवलावर आपले स्वतःचे कॅल्क्युलेटर रिपेयरिंग दुकान सुरु केले. ह्याच काळात त्यांनी खूप छोट्या प्रमाणात कॉम्प्युटर रिपेयरिंगचे सुद्धा काम सुरु केले. त्यांनी कमी किमतीमध्ये सामान्य लोकांना परवडेल अश्या किमतीत Anti-Virus उपलब्ध करून देण्याचा घाट घातला, त्यासाठी त्यांनी काही हुशार कॉम्पुटर तज्ञांना नोकरीस ठेऊन त्यांच्या कडून Quick Heal हे प्रसिद्ध Anti-Virus तयार केले, आज ते एक यशस्वी उद्योजक आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. आज आपण त्यांना एक एक्स्ट्रा-ऑर्डीनरी व्यक्ती म्हणू शकतो कारण एका साधारण कॅल्क्युलेटर रिपेयर करणाऱ्या पासून ते एक यशस्वी उद्योजकाची जडण घडण कशी झाली ते आपण पाहिले.

तर पाहूयात एक्स्ट्रा-ऑर्डीनरी लोकांचे काही गुण :

१. गरजेच्या गोष्टींना प्राधान्य देणे : तुमच्या दैनंदिन आयुष्यात अश्या बऱ्याच गोष्टी येऊ शकतात ज्यामुळे तुमचे अमूल्य लक्ष विचलित होऊ शकते, किंबहुना अश्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लक्ष्यापासून दूर नेऊ शकतात. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही फक्त त्याच गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा ज्याचा तुमच्या करियर साठी उपयुक्त आहेत. चांगली पुस्तके वाचणे, दैनंदिन घडामोडींची खबरबात ठेवणे अश्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडू शकतात कारण ह्या गोष्टींमुळे आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडत राहते.

२. दयाळूपणा तसेच नम्रता: आपल्या पेक्षा कनिष्ठ व्यक्तींशी वागताना आपण कायम नम्रतेने वागा, ज्यामुळे आपल्याला त्यांचा विश्वास आणि आदर मिळेल. अनेक वेळा आपली एक चांगली प्रतिमा त्यांच्या मनात निर्माण होते.

३. आपल्या चुका मान्य करण्याची ताकद आणि त्या चुकांमधून शिकण्याची कला: चुका करतो तोच माणूस असतो आणि चुका मान्य करणारा एक्स्ट्रा-ऑर्डीनरी माणूस असतो, आपल्या चुका मान्य केल्यामुळे आपल्याला कधीच कमीपण येत नाही, उलट आपल्या चुका मान्य केल्यामुळे त्या आपल्या लक्षात राहतात आणि त्या आपल्या हातून पुन्हा होत नाहीत.

४. मन-मिळाऊ वृत्ती: सर्वांसोबत मिळून मिसळून राहिलेला माणूस कधीपण प्रगती करतो. सर्वांसोबत बोलण्यामुळे निश्चितच आपल्या ज्ञानात भर पडून आपल्याला दुसऱ्यांसमोर बोलताना नक्कीच ह्या विचारांचा उपयोग होऊ शकतो.

५. छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याची वृत्ती किंवा समाधानी वृत्ती: आपल्या जवळ जे आहे त्यात समाधानी राहणे हि एक कला आहे. निर्मोही आयुष्य जगण्यासाठी हा गुण कामी येऊ शकतो. जास्तीची हाव धरल्याने आपले दैनंदिन काम बिघडू शकते, आपले लक्ष पूर्णतः आपल्या लक्ष्यावर असले तरीही हि गोष्ट कायम सांभाळून राहणे फार महत्वाचे आहे.

ह्या ५ गोष्टी आपण जर अमलात आणल्या तर एक्स्ट्रा-ऑर्डीनरी म्हणून ओळख निर्माण करण्यास आपल्याला वेळ लागणार नाही.  

विद्यार्थ्यांना अश्या एक्स्ट्रा-ऑर्डीनरी लोकांकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात, उदाहरणार्थ समजा एखाद्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती नसेल पण त्याला शिकण्याची इच्छा असेल तर त्याने काहीही करून ते ज्ञान मिळवण्यासाठी कायम धडपड केली पाहिजे, धडपड करणाऱ्यास ह्या जगात नक्कीच मार्ग सापडतो, किंवा एखाद्या विद्यार्थ्याकडे ज्ञान असेल पण ते त्याला व्यक्त करण्याची कला अवगत नसेल तर त्याने लोकांसोबत बोलण्याची कला शिकली पाहिजे, ह्या सर्व गुणांमध्ये आपल्याला दिसून येईल कि ह्या खूप साध्या-साध्या गोष्टी असतात आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो.

निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स(Nilaya icats institute of commerce) मध्ये आम्ही ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना अश्या गोष्टी सुद्धा शिकवतो ज्यातून त्यांच्या व्यक्तिगत गुणांना पैलू पडतात, Soft Skills म्हणा किंवा Inter-personal Skills,  निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना शब्दश:  घडवतो. तर एक्स्ट्रा-ऑर्डीनरी बनण्यासाठी जे काही आवश्यक गुण किंवा Skills आहेत त्याची तयारी आम्ही Commerce आणि Finance क्षेत्रातील ज्ञानासोबतच करून घेत असतो.   

आपल्याला जर ह्या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर  अधिक माहिती करता आमच्या वेब-साईटला भेट द्या किंवा आमच्या शाखेत संपर्क साधा.