CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
icats
DOWNLOADS
CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
marathi-text
DOWNLOADS
विद्यार्थ्यांच्या निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सबद्दलच्या प्रतिक्रिया आणि प्रशंसापत्र

आपण कोणतीही गोष्ट खरेदी करताना भरपुर दुकानांमध्ये जाऊन आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टीची चौकशी करतो आणि ज्या दुकानामध्ये आपल्याला समाधानकारक किंमतीमध्ये आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळते त्याच दुकानातुन आपण खरेदी करतो, एखादा मोबाईल जरी खरेदी करायचा असला तरी आपण आपल्या मित्रांना मोबाईल बद्दल विचारतो किंवा इंटरनेट वर मोबाईल बद्दलचे Reviews आणी Tips वाचतो, मोबाईल च्या परफॉर्मन्स बद्दल विचारतो आणि मग आपण कोणता मोबाईल घ्यायचा ते ठरवतो, थोडक्यात आपण सर्वांचा विचार ऐकूनच निर्णय घेतो कारण आपल्या मनात एक प्रकारची भीती असते जी आपल्याला लोकांचे सल्ले घ्यायला भाग पडते.

एखादा व्यक्ती कोणाचाही विचार किंवा सल्ला न ऐकता निर्णय घेतो आणि त्याने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे फसतो तेव्हा त्याची जी अवस्था होते ती अवस्था आपली होऊ नये हीच ती भीती असते आणि अशी भीती आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक निर्णय घेताना वाटत असते. शाळा किंवा कॉलेज मध्ये ऍडमिशन घेण्याचेच उदाहरण घ्या ना,.. कोणत्याही शाळा किंवा कॉलेज मध्ये ऍडमिशन घेताना आपण थोडीशी चौकशी करतोच, शाळा/कॉलेज मध्ये सर्व सुविधा आहेत का? शाळा/कॉलेज जवळचा परिसर कसा आहे, शाळा/कॉलेज मधील शिक्षण पद्धत कशी आहे? शाळा/कॉलेज मध्ये नवीन काय आहे जे इतर शाळा/कॉलेज मध्ये नाहीये अश्या शंका मनात येतातच आणि आपल्या मनातील शंका दूर झाल्या शिवाय आपण ऍडमिशन घेत नाही, पण ज्या संस्थेमध्ये ऍडमिशन घेण्याअगोदर आपल्या सर्व शंकांचे समाधान होत आहे अश्या संस्थेमध्ये आपण नक्कीच ऍडमिशन घेतले पाहिजे

निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये ऍडमिशन घेण्याअगोदर मनात शंका येतीलच, थोडासा विचार करावाच लागेल आणि थोडीशी भीती सुद्धा वाटेल.. पण या निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांचे मत जाणुन घेतले तर बऱ्याच शंका दुर होतील कारण एखाद्या संस्थे मध्ये शिकणारा विद्यार्थीच सांगु शकतो कि त्याने ज्या शिक्षण संस्थे मध्ये शिक्षण घेतले आहे ती शिक्षण संस्था कशी आहे, त्या संस्थेमधील सुविधा कश्या आहेत आणि त्या संस्थेमधून शिक्षण घेऊन त्यांचा स्वतःचा किती फायदा झाला आणि त्यांच्या स्वतःमध्ये किती बदल झाला?.. चला तर मग पाहुयात निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स या संस्थेमधील विद्यार्थ्यांचे त्यांच्याच शब्दातील मत…

प्रणित चव्हाण
अगदी १० – १२ वेळेस चौकशी करायला आलो होतो. प्रत्येक वेळी ICATS वरचा विश्वास वाढतच होता आणि त्यामुळेच CAFM COURSE केला आणि आज आयुष्यच बदलून गेलं. भावालाहि admission घेतली. तो पण आज SKP e-SOLUTIONS मध्ये JOB करतोय . मित्रांनो LIFE SET..अजून काय पाहिजे. आपणंतर जाम खुष आहे LIFE मध्ये.

विक्रांत चव्हाण
जो भी करेगा कमाल का करेगा !!! हे आमच्या Icats चं ब्रीदवाक्य. आज सगळ्याच कामात हि सवयच लागली आहे. आज SKP e_SOLUTIONS मध्ये काम करतांना हाच FANDA वापरतो, सगळेच seniors खूष आहेत. Icats ला खूप खूप मनापासून धन्यवाद पण त्या पेक्षाही जास्त thanks to my BRO, Praneet. He inquired so many times in ICATS and took his and my admission also. THANKS BRO….

सचिन नलावडे
माझे गाव करमाळा.I-CATS मधून course करून दोन वर्ष पुण्यात experience घेतला.आज निलय सरांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मी जेऊरला (करमाळा)नोकरीला लागलो . आज गावी असूनही मस्त पगार मिळतो आहे. घरी पण सगळे जाम खुश आहेत. Thank you Nilay sir.

प्रकाश बेलीकर, दौंड.
बीकॉम मध्ये खूप कमी मार्क्स मिळाले तेंव्हा वाटले नव्हते आता मोठे यश मिळेल. पण निलया आय-कॅटस् ने जणू माझ्यावर जादू केली. इतके छान स्किल्स मिळाले की २०१४ मध्ये पुणे शहरातील Afour Technologies मध्ये नोकरीला लागलो तेव्हा २.५ लाख पगार होता आणि २०१७ मध्ये ४.५ लाख पगार घेतोय. तुम्ही ही घडवा तुमचे करिअर ICATS बरोबर आणि व्हा तयार भविष्यासाठी !!!!

स्वप्नील सांगोळे
२०१३ मध्ये CAFM ला अॅडमीशन घेतली तेंव्हा मला मराठी पण नीट बोलता येत नव्हत. बी.कॉम मध्ये खूपच कमी मार्क्स होते, इंग्लिशची बोलण्याची भीती सुद्धा होती, अशा अवस्थेतून निलयाज् आय-कॅटस् ने मला वर काढलं. आज २०१५ मध्ये मी MTDC मध्ये गव्हर्नमेंट जॉब करत आहे व २.५ लाखाचा पगार घेतोय. याचं श्रेय जाते पायल मेहता मॅडम व इतर सर्व शिक्षकांनी दिलेल्या छान वैयक्तिक लक्षाला.

अतुल कुलकर्णी, पुणे.
खूप छान वैयक्तिक लक्ष दिलं जात निलयाज् आय-कॅटस् मध्ये, की मी मराठी मिडीयम मधून आलेलो असलो तरी सर्व स्कील्स मध्ये अगदी मास्टर झालो व आज गव्हर्नमेंट कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करतोय.

वैशाली भांगे
महागाईचे चटके बसणाऱ्या अनेक गृहीनीना नोकरी करावीशी वाटणे हे स्वाभाविकच आहे, मी पण असाच विचार करत होते. माझं स्वप्न हि मोठ्ठ होत. मला MNC मध्येच जॉब करायचा होता. I-CATS मधून CAM Course करून हे स्वप्न पण पूर्ण झालं. अगदी Job Join करून पहिल्याच महिन्यातच ” Best Employee of the Month” हा Award पटकावला तो हि चक्क L&T मध्ये.

निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये ऍडमिशन घेण्या अगोदर सर्वांच्या शंकाचे समाधान केले जाते आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाते, निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये शिकवताना रट्टा पद्धत अवलंबली जात नाही याउलट प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल आणि कृतीतून प्रशिक्षण दिले जाते, निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये ऍडमिशन घेताना प्रत्येक विद्यार्थ्याला स्टॅम्प पेपर वर लिहुन दिले जाते कि या संस्थेतुन शिक्षण घेऊन बाहेर पडताना तुमच्या हातात नोकरी असेल आणि तुमच्या नोकरीची जबाबदारी निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स या संस्थेची असेल..निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या ह्या संस्थेच्या समस्या आहेत असे समजूनच त्या समस्यांवर उपाय शोधला जातो.एक सक्षम विद्यार्थी घडवला जात आहे, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकास आणि व्यावसायिक विकास चे प्रशिक्षण दिले आहे, विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले जात आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास केला जात आहे.. अश्या निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये ऍडमिशन घ्यायलाच हवे.