CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
icats
DOWNLOADS
CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
marathi-text
DOWNLOADS
लवकर प्रमोशन मिळवण्यासाठी उत्तम अभ्यासक्रम

लवकर प्रमोशन मिळवण्यासाठी उत्तम अभ्यासक्रम

शहरी असो अथवा ग्रामीण, बऱ्याच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ध्येय नोकरी मिळविणे हेच आहे, आणि ते ठीकच आहे, कारण आपण घेतलेल्या शिक्षणाचा आपल्या विकासासाठी उपयोग व्हावा ही प्रत्येकाचीच इच्छा असते. आज आपण शिक्षणाची नैतिकता कुठेतरी हरवत आहोत आणि याला कारणीभूत आहे ती आजची स्पर्धात्मक शिक्षण पद्धती. मुलांपेक्षा पालकांच्याच अपेक्षा पूर्ण करण्याचाच जास्त ताण मुलांवर असतो, शेजारील अमुक एक विद्यार्थ्याने बघ तुज्यापेक्षा जास्त गुण मिळवले, तुझ्या मित्राने अमुक एका स्पर्धेत बक्षीस मिळवले, आणि तू मात्र ढिम्मच अशा आशयाची सतत टोमणी मुलांना दिल्यामुळे ते सतत निराशे मध्ये वावरत असतात आणि मग आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलतात. याला सर्वस्वी आपला समाज जबाबदार आहे. पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर न  लादता त्यांची मानसिकता आणि कल ओळखून त्यांना हवे त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यास संधी द्यावी. चांगला जॉब मिळवण्यासाठी आनंदमय वातावरणात शिक्षण घेण्याची आवश्यकता असते जेणे करून मुलांना अभ्यासाचा कंटाळा वाटणार नाही तर त्यामध्ये गोडी निर्माण होईल.

असे म्हणतात की ‘शाळेत शिकविलेले सगळे विसरल्यानंतर जे उरते ते म्हणजे शिक्षण’ आणि याचा प्रत्यय प्रत्येक ठिकाणी आपल्याला येतो आहे. सध्या नोकरीपर्व सुरु आहे असे म्हटल्यास अतिशोयोक्ती ठरणार नाही. माहिती तंत्रज्ञानाचाच्या कक्षा रुंदावल्यामुळे जग झपाट्याने बदलत आहे. दिवसेंदिवस रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होत आहेत. आजच्या हायटेक जगात अगदी कल्पना देखील विकू शकते फक्त त्यासाठी तुम्हाला तुमच्यातील क्षमता ओळखता आली पाहिजे. इंटरनेट मुळे स्मार्टफोनने युवकांच्या मनाचा केंव्हाच ताबा घेतलेला आहे. इंटरनेटच्या क्रांतीमुळे खेडी देखील दिवसेंदिवस प्रगत होत आहेत .चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणे, चांगली शिकवणी लावणे ही बाब आता केवळ शहरापुरतीच मर्यादित राहिली नसून ग्रामीण भागातील युवकही मोठ्या संख्येने दर्जेदार शिक्षणासाठी पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांकडे वळताना दिसत आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्याला ज्याअर्थी पुण्या सारख्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवितात त्याअर्थी त्यांना आपल्या पाल्याची दर्जेदार शैक्षणिक प्रगती अपेक्षित असते आणि अभिप्रेत असतो तो चांगला जॉब. इन्स्टंट जॉब देणारं शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी पुण्यासारख्या शहरामध्ये जेंव्हा एखाद्या इन्स्टिट्यूटचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा शिक्षण क्षेत्रातील प्रचंड जाहिरात बाजीमुळे त्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते अशा वेळी विद्यार्थ्यानी भ्रामक जाहिरातींना भुरळून न जाता योग्य निर्णय घेऊन गुणवत्तेची कास धरावी. इन्स्टंट जॉब ओरीयंटेड आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्याची बाँड पेपर वर लेखी हमी देते ते पुण्यातील नामवंत इन्स्टिट्यूट अर्थात निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’.

            चांगला जॉब मिळविणे जितके अवघड तितकेच तो टिकविणे देखील अवघड असते. जॉब मिळाला म्हणजे संपले असे नाही तर जॉब मिळविणे हा एक टप्पा असतो तर तो टिकवून ठेवणे किंबहुना जॉब करताना त्यामध्ये प्रमोशन मिळविणे हा दुसरा टप्पा असू शकतो. तुम्ही जरी नोकरी करत असाल तरी तुमच्या कडे शिकण्याची संधी असते आणि ते शिक्षण तुमच्याच विकासासाठी उपयोगी असतं. आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स तुम्हाला असे कोर्सेस उपलब्ध करून देतं ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीत फास्ट प्रोमोशन मिळण्याची पूर्ण शक्यता असते. लवकर प्रमोशन मिळण्यासाठी उत्तम अभ्यासक्रमांची आवश्यकता असते आणि असे उत्तम अभ्यासक्रम शिकविले जातात पुण्यातील नामवंत आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’.मध्ये.आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’. मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. इथे शिक्षणाव्यतिरिक्त दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणारे शिक्षण दिले जाते त्यामुळे खऱ्या अर्थाने इतरांपेक्षा आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’.चे वेगळेपण सिद्ध होते. विद्यार्थ्यांची पसंती आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’लाच असेल अशी खात्री आहे कारण आय-कॅट्सचे ध्येय गुणवत्ता वाढविणे आहे. संख्या वाढविणे नव्हे.