CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
icats
DOWNLOADS
CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
marathi-text
DOWNLOADS
यश आणि श्रेष्ठता कमावण्यासाठी उत्तम नेतृत्व गुणांची आवश्यकता.

नेतृत्व हे मॅनेजमेन्टच्या अनेक तत्वांपैकी एक महत्वाचे तत्व आहे. कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणीत नेतृत्वाची अत्यंत गरज असते. एका नियोजित ध्येयाकडे घेऊन जाण्यासाठी आणि कार्याचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी अनेकदा योग्य नेतृत्वाची गरज असते.

कोणत्याही क्षेत्रातील लीडरने पूर्ण टीमचा विचार करून चालायला हवे. टीम जर समाधानी असेल तरच लीडरच्या नेतृत्वाचा निकाल समाधानकारक असेल अन्यथा लीडरवर आणि संपूर्ण टीमवर अपयश व निराशेचे पांघरून घालावे लागते. लीडर हा स्वतःवर आणि स्वतःच्या टीमवर विश्वास ठेवणार असावा, तसे नसेल तर लीडरला अपयशाच्या काट्यावरून आणि निराशेच्या विस्तवावरून चालावे लागते.

एका उत्तम लीडरचे उदाहरण द्यायचे झाले तर सर्वप्रथम महेंद्र सिंग धोनीचे नाव डोळ्यासमोर येते. एका साधारण कुटुंबातून आलेला धोनी एक दिवस भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार म्हणून भारतासाठी खेळेल असं त्याला स्वतःलाही वाटले नव्हते. माही ने त्याच्या जीवनात खूप चढ उतार पहिले, आणि आज जगभरात सर्वांनाच महेंद्र सिंग धोनी हे नाव माहित आहे. जेव्हा महेंद्र सिंग धोनी कर्णधार झाला त्यानंतर २००९ साली भारतीय क्रिकेट संघ टेस्ट क्रिकेटच्या रँकिंगमध्ये उच्च स्थानावर गेली. पहिला टी-२० वर्ल्ड कप भारताने स्वतःच्या नावावर केला. १९८३ सालानंतर भारतात एकदिवसीय सामन्याचा वर्ल्डकप महेंद्र सिंग धोनी (कर्णधार) यांच्या नेतृत्वा खाली आला. भारतात क्रिकेट टीमचे आजपर्यंत जेवढे कर्णधार होऊन गेले त्या सर्व कर्णधारांचे विक्रम धोनीने मोडले. धोनीच्या शांत स्वभावामुळे त्याला कॅप्टन कूल नावाने ओळखू जाऊ लागले. धोनीचा स्वतःवर आणि आपल्या संघावर पूर्ण विश्वास आहे म्हणूनच त्याने क्रिकेट खेळात भारताचे नाव जगाच्या नकाशात ठळक अक्षरात गोंदवले
सर्वांनाच महेंद्र सिंग धोनी हे नाव माहित आहे. धोनी कर्णधार झाल्यानंतर आपण क्रिकेटमध्ये उच्च स्थानावर पोचलो, तसेच पहिला टी-२० वर्ल्ड कप भारताच्या नावावर झाला. तसेच. १९८३ नंतर पहिलाच एकदिवसीय सामन्यातील वर्ल्ड कप आपल्याकडे आला. आत्तापर्यंतच्या सर्व कर्णधारांचे विक्रम धोनीने मोडले. त्याच्या शांत स्वभावामुळे त्याला कॅप्टन कूल म्हणून ओळखले जाऊ लागले. धोनीचा स्वतःवर आणि आपल्या संघावर पूर्ण विश्वास होता म्हणूनच तो क्रिकेट विश्वात भारताचे नाव ठळक अक्षरात गोंदवू शकला.

स्वतःबरोबर सर्वांचा विचार करून नेतृत्व करणारा लीडर असतो, सर्वांच्या समस्या समजून घेणारा आणि त्या समस्यांचे निवारण करणारा खरा लीडर असतो, स्वतःपेक्षा समाजासाठी उभा राहणारा आणि लढणारा तो लीडर असतो. चाणाक्ष, चतुर आणि बुद्धिमान असूनही प्रत्येक गोष्टीचा वारंवार विचार करणारा लीडर असतो. लीडर बनणे सोपे आहे पण स्वतःच्या स्थानावर आणि लोकांच्या मनात टिकून राहणे खूप अवघड आहे पण जो लोकांच्या मनात टिकून राहतो तो लीडर असतो.

एका लीडरला यशस्वी होण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता असते.

कम्युनिकेशन स्किल्स : बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती असते की टीम मधील सदस्य लीडरशी संभाषण करताना थोडे घाबरतात, त्यामुळे ही लीडरची जबाबदारी आहे की त्याने टीम मध्ये मैत्रीपूर्ण वातावरण ठेवावे आणि सर्व सदस्यांना बोलण्याची संधी द्यावी.

डिसिजन मेकिंग स्किल्स: यशस्वी लीडरला पटकन योग्य निर्णय घेता यावा, समस्या छोटी असो किंवा मोठी असो लीडरचा निर्णय नेहमी योग्य असावा आणि निर्णय घेण्यासाठी त्याने जास्त वेळ लावू नये.

टार्गेट ओरिएंटेड: लीडरला ध्येयाची जाणीव असायला हवी आणि त्याने टीम मधील सदस्यांना सुध्दा आपल्या ध्येयाची जाणीव करून द्यायला व्हावी.

टीम मॅनेजमेन्ट: लीडरला टीम मधील सदस्यांची काम करण्याची क्षमता माहित असायला हवी आणि त्यांच्या क्षमते नुसार लीडरने सदस्यांना आवाहन करायला हवे, सदस्यांमध्ये स्वाभिमान जागृत करायला हवा.

ऍप्रिसिएशन : लीडरने टीम मधील सदस्यांच्या कामाची स्तुती करायला हवी, जर काम चुकीचे झाले असेल तर ते काम कसे बरोबर करायला हवे हे समजून सांगायला हवे. जेव्हा टीम मधील सदस्य उत्तम कामगिरी पार पाडतो तेव्हा त्या सदस्याची स्तुती सुद्धा करायला हवी.

पॉसिटीव्ह थिंकिंग: लीडरचे विचार आणि स्वभाव नेहमी सकारात्मक असायला हवा. एखाद्या गोष्टीला नकार देतानाही लीडरने सकारात्मक भाषेचा वापर करायला हवा.

गुड कोच: लीडर कोणत्याही क्षेत्रातील असो पण तो एक उत्तम शिक्षक असावा. जेव्हा टीम मधील सदस्यांना शिकवण्याची वेळ येते तेव्हा त्याने उत्तम शिक्षकाची भूमिका साकारायला हवी.

कॉन्फिडन्स: लीडर नेहमी स्वाभिमानी आणि स्वतःवर विश्वास ठेवणारा असावा.

फ्यूचरिस्टिक: लीडर भविष्याचा विचार करणारा असावा, पुढे काय काम करायचे आहे, कसे काम करायचे आहे, काम करण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज पडेल असे भविष्यातील योजना तयार ठेवणारा यशस्वी लीडर असतो.

पॉझिटिव्ह अटीट्युड: लीडर ला स्वतःला आणि त्याच्या टीमला कोणत्याही कामात यशस्वी व्हायचे असेल तर लीडरने “तो आणि त्याची टीम यशस्वी होती, यशस्वी आहे आणि यशस्वी होणार” याच दृष्टीने आणि ऍटिट्यूड ने काम करायला हवे.

प्रत्येकामध्ये एक लीडर लपलेला आहे, स्वतःमध्ये लपलेल्या लीडर ला बाहेर काढण्याअगोदर लीडर काय असतो हे समजून घेणे तसेच वरील स्किल्स समजून घेणे आणि त्या आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. कोणीही जन्मतःच यशस्वी नसते, यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट करण्याची तयारी असायला हवी आणि काम केले तर योग्य पद्धतीनेच करेन आणि योग्य काम करेन हा भाव मनात असायला हवा.