इंटरनेटमुळे आज जेवढ्या संधी डिजिटलज मार्केटिंगमध्ये निर्माण झालेल्या आहेत तेवढ्या संधी कदाचित याआधी कुठल्याच क्षेत्रात निर्माण झाल्या नसेल. प्रत्येकजण सोशल मिडियामुळे एकमेकांशी जोडला गेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ह्या माध्यमांवर इंग्रजी भाषेत विचारांची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे बहुतांशी मोठमोठ्या कंपन्या उत्पादन विक्रीसाठी फेसबुक, व्हॉट्सऍप, व्टिटर अशा लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करताहेत. माझा एक मित्र, जो डिजिटलज मार्केटिंगमध्ये करिअर करण्यास अत्यंत इच्छुक होता, त्याने वेगवेगळ्या कंपनीमध्ये अर्ज देखील केला होता पण प्रत्येक वेळी जे व्हायचे तेच होत होते. केवळ इंग्रजी भाषा येत नसल्यामुळे त्याला ती संधी गमवावी लागली. चांगल्या करिअरसाठी अस्खलित इंग्रजी येणे खूपच आवश्यक आहे आणि हे जॉब मिळविण्यासाठी किती महत्त्वाचे आहे ते या उदाहरणांवरून तुम्हाला कळले असेलच.
प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो आणि तो असायलाही हवाच पण त्या बरोबरीनेच इंग्रजी या व्यावहारिक भाषेचे ज्ञान असणे ही आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये इंग्रजी येणे खूपच आवश्यक झाले आहे. सर्वच ठिकाणी इंग्रजी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढले आहे अगदी किराणा दुकानापासून ते मोठमोठ्या मॉल पर्यंत, ऑफिसमध्ये, समारंभ, विविध प्रकारची सेमिनार्स यामध्ये इंग्रजी भाषेचा वापर सर्रासपणे वाढत चाललेला आहे, त्यामुळे इंग्रजी भाषा आल्याशिवाय गत्यंतर नाही असे म्हणल्यास अतिशोयोक्ती ठरणार नाही. पण केवळ इंग्रजी भाषा येत नाही म्हणून काय तुम्ही हुशार नाहीत? नक्कीच हुशार आहात. केवळ इंग्रजी भाषेच्या ज्ञानावरून तुमचे मूल्यमापन होऊ शकत नाही. पण जरा वेगळ्या दृष्टीकोनातून विचार केला तर आजच्या काळात इंग्रजी येणे खूपच गरजेचे झाले आहे याची खात्री आपल्याला वेळोवेळी येते.
ऑफिसमध्ये मिटिंग सुरु असतांना बॉस इंग्रजीमध्ये एखाद्या महत्त्वपूर्ण विषयावर सर्वांशी चर्चा करत असतात. आपले सहकारीही चर्चामध्ये इंग्रजीत प्रभावीपणे मत व्यक्त करून आपला प्रभाव पाडत असतात. सर्वच जण स्वतःला बॉस समोर सिद्ध करण्यासाठी धडपडत असतांना आपल्यालाही जास्त वेळ शांत बसता येणे शक्य नसते त्यामुळे चेहऱ्यावरचे हावभाव दाखवून आपण कशीतरी वेळ मारून नेतोही पण खरी पंचाईत तेंव्हा होते जेंव्हा बॉस स्वतः आपल्याला विचारतात What’s your opinion आणि मग आपण कितीही चांगले काम केले तरी इंग्रजीमध्ये विचारलेल्या प्रश्नांना मराठीमध्ये उत्तर देतांना जी भावना निर्माण होते ती परिस्थिती खरोखरच अत्यंत निराशाजनक आणि आत्मविश्वास खच्चीकरण करणारी असते. त्यामुळे बरीच उदाहरणे आहेत की जॉब मिळवण्यासाठी एक कोर्स आणि मिळवलेला जॉब टिकविण्यासाठी दुसरा कोर्स करावा लागतो.
तुम्ही किती हुशार आहात हे तर महत्त्वाचे आहेच पण तुमच्याजवळ असलेले ज्ञान तुम्ही कशाप्रकारे प्रभावीपणे मांडू शकता याला देखील खूप महत्त्व आहे, १८९३ मध्ये शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदने हिंदू धर्माविषयी प्रभावीपणे भाषण देऊन सगळ्यांना जिंकलं आणि जगात भारतीय संस्कृतीची आदरयुक्त पताका फडकविली. स्वामी विवेकानंद, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी असे कितीतरी उदाहरणे देता येतील ज्यांनी इंग्रजी भाषेच्या प्रभूत्त्वामुळे आपले वेगळेपण सिद्ध करून जगावर ठसा उमटविला आहे. भाषेवर प्रभुत्त्व असणे किती महत्त्वाचे असते ते यातून सिद्ध होते आणि जागतिक पातळीवर जर तुम्हाला ठसा उमटवायचा असेल तर केवळ इंग्रजी येऊन भागणार नाही तर त्यावर प्रभुत्त्व सुद्धा मिळवावे लागेल.
Globalization मुळे सर्व जग जवळ आले आहे त्यामुळे जॉबसाठी किंवा व्यवसायासाठी विदेशी जाण्याची वेळ आल्यास केवळ इंग्रजी भाषाच तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करू शकते. विद्यार्थ्यांचा स्वभाव, त्याचा अभ्यासातला कल कुणीकडे आहे किंवा त्याला जास्त ओढ कोणत्या विषयाची आहे? आपण शिकविलेले विद्यार्थ्याना किती कळले आहे? आणि जर कळले नसेल तर कोणती बाब आहे जी विद्यार्थ्यांना अवघड जात आहे? विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता कशी आहे? ह्या सर्व गोष्टींचा आय-कॅट्समधील शिक्षक अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या करिअर डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न केले जातात. आय-कॅट्समध्ये अत्यंत प्रभावीपणे कॉमर्स क्षेत्रातील अभ्यासक्रम शिकविले जातात. . दैनिक सकाळ, दैनिक पुढारी, दैनिक लोकमत या आघाडीच्या वृत्तपत्रांनी आय-कॅट्सने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामांची दाखल घेतली आहे. ‘शिक्षणदूत’ हा मनाचा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची साक्ष देतो.
ग्रामीण भागातही शिक्षणाची जागृती मोठ्या प्रमाणावर होत आहे. आयुष्यभर कष्टमय जगलेले जीवन आपल्या मुलांच्या वाट्यास येऊ नये म्हणून शेतकरी देखील आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिक्षणासाठी पाठवितात. ज्यावेळी पई पई गोळा करून ग्रामीण भागातील विद्यार्थी आय-कॅट्समध्ये प्रवेश घेतात त्यावेळी आय-कॅट्सही समाजातील अशा प्रत्येक घटकांच्या उन्नतीसाठी बांधील आहे ज्यांना खरोखरच प्रगतीची आवश्यकता आहे.
भविष्यातील काळाची पाऊले ओळखून आय-कॅट्सने विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा प्रभावीपणे बोलता यावी यासाठी AV Excellence room ची संकल्पना राबवीत आहे. AV Excellence room मध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्याचे अभिनव शिक्षण दिले जाते ज्यामुळे विद्यार्थी इंग्रजी भाषा बोलण्याचे कौशल्य आत्मसात करून आत्मविश्वासाने करिअरमध्ये प्रगती करताहेत. काय आहे AV Excellence room संकल्पना? कशी आहे इथे इंग्रजी शिकविण्याची पद्धत? कसा निर्माण होतो इथे इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास? त्यासाठी पुण्यातील आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’ ला एकवेळ नक्कीच भेट द्या. कारण सर्वगुणसंपन्न असूनही केवळ इंग्रजी भाषा येत नसल्यामुळे तुम्हाला जॉबसाठी मुकावे लागत असेल तर ही नक्कीच खेदाची बाब आहे असे म्हणायला हरकत नाही.