संभाषणाला आपल्या संपूर्ण करियर मध्ये असाधारण महत्व आहे, तुम्ही विचार करत असाल, का असे ? आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत.
दैनंदिन कार्यालयीन कामकाजात आपण असंख्य व्यक्तींच्या सान्निध्यात येतो, आपले कनिष्ठ सहकारी असोत किंवा आपले बॉस असो, आपल्याला ह्या सर्वांबरोबर सलोख्याने वागणे खूप महत्वाचे असते. पण हे एक प्रकारचे स्किलच आहे आणि हे स्किल संपादित करणे खूप सोपे आहे, जर तुम्हाला हे स्किल जमले तर एक प्रभावी कम्युनिकेशन करणे आणखी सोपे जाईल.
आम्ही निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स येथे अनुभव घेतो कि अनेकदा छोट्या गावांमधून आमच्या कडे विद्यार्थी येतात ज्यांना एक वाक्य सुद्धा इंग्रजी मध्ये बोलता येत नाही, किंवा आपली स्वतःची माहिती सुद्धा ते इंग्रजी मध्ये सांगू शकत नाहीत, या ठिकाणी मुद्दा इंग्रजी न येण्याचा किंवा इंग्रजी शब्द माहित नसण्याचा नसतो तर प्रॉब्लेम असतो तो आत्मविश्वासाचा अभाव. २ वर्षापूर्वी आमच्याकडे साताऱ्याजवळच्या ग्रामीण भागातून एक मुलगा आला होता ज्याला Accounts आणि Finance क्षेत्रात नोकरी करण्याची खूप इच्छा होती. त्याला ह्या क्षेत्रातील माहिती जरूर होती पण त्याला Interview देण्याची खूप भीती वाटत होती, कारण फक्त एकच होतं, धडाधड इंग्रजी न बोलता येणे. आज तोच मुलगा एका MNC मध्ये ६ लाख रुपये वार्षिक एवढ्या पगारावर नोकरी करीत आहे.
निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना कॉमर्स मधील ज्ञाना बरोबरच सोफ्ट स्किल्स जसे कि कम्युनिकेशन, बॉडी लँग्वेज इत्यादी सुद्धा शिकवतो.
प्रभावी कम्युनिकेशन का गरजेचे आहे? किंवा प्रभावी कम्युनिकेशन मुळे काय फरक पडतो?
१. घरातल्या लोकांशी बोलत असताना आणि सार्वजनिक ठिकाणी बोलताना काही विशेष काळजी घेतल्या पाहिजेत. बाहेरच्या लोकांशी बोलत असताना आपल्याला दुसऱ्यांच्या भावनांना न दुखवता भाषेचा वापर केला पाहिजे.
२. कार्यालयीन कामकाजात भाषेचा वापर अतिशय जपून बोलावे लागते, कॉर्पोरेट लँग्वेज चा जास्तीत जास्त वापर करून आपल्या सहकाऱ्यांशी एक उत्तम संभाषण होऊ शकते.
३. संभाषण करत असताना आपला आत्मविश्वास दिसून आला पाहिजे, एखाद्या ठिकाणी इंटरव्यूला सामोरे जाताना आपण काय बोलतो त्याहीपेक्षा आपण कसे बोलतो हे महत्वाचे ठरते.
४. कोणत्याही ठिकाणी बोलत असताना निडर होऊन आपला मुद्दा मांडणे खूप गरजेचे आहे
५. निडर होऊन बोलण्याने सुद्धा आपल्यातला आत्मविश्वास दिसून येतो आणि लोकांचा विश्वास संपादन करण्यात वेळ लागत नाही.
संवाद साधताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून बोलता येणे म्हणजेच उत्तम प्रकारचा संवाद साधणे होय. भाषेची समस्या, घाबरत बोलणे आणि आत्मविश्वास यापैकी एकतरी समस्या सर्वांनाच असते. ह्या समस्या दूर करण्यासाठी निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स ने विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम राबवला जातो . या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संवाद साधताना कसे बोलावे आणि काय बोलावे यावर प्रशिक्षण दिले जाते. कारण निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स ला प्रत्येक विद्यार्थ्याच्या समस्या आणि विविध क्षेत्रात येणाऱ्या अडचणी ठावूक आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्जवल भविष्याचा हा एक महत्वाचा प्रयत्न आहे जो विद्यार्थ्यांना सक्षम बनवतो.
विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या ह्या विशेष प्रशिक्षणात विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा म्हणून त्यांना स्वतःची क्षमता दाखवून दिली जाते आणि विद्यार्थ्यांनी स्वतःशी ओळख करून दिली जाते. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर केली जाते आणि संवाद साधताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवून संवाद साधायला हवा याचे प्रशिक्षण दिले जाते.
बऱ्याच विद्यार्थ्यांना खुपश्या गोष्टी माहिती नसतात ज्या प्रोफेशनल जीवनात खूप महत्वाच्या आहेत. निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच सुरु करण्यात आलेली आहे. निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे कोर्सेस तर शिकवले जातातच याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाते.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे आणि शैक्षणिक सुविधांकडे तर निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स चे लक्ष असतेच, या शिवाय निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स ची शिक्षण पद्धत जरा वेगळी आहे. या संस्थे मध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल द्वारे मिळणाऱ्या ज्ञानाला प्राधान्य दिले जाते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या संस्थेमध्ये शिकल्यानंतर १००% नोकरीची हमी दिली जाते. १००% नोकरी मिळेल याचा पुरावा म्हणून स्टॅम्प पेपर वर लिहून दिले जाते. येथे आलेल्या प्रत्येक विद्यार्थी हा कॉमर्स मधील प्रॅक्टिकल स्किल्स चे ज्ञान घेऊन परिपूर्ण होण्याबरोबर त्याची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स सदैव कार्यरत आहे.
चला तर आपण या संधी चा फायदा घेऊ आणि स्वतः चे एक परिपूर्ण व्यक्तिमत्व निर्माण करू.