CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
icats
DOWNLOADS
CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
marathi-text
DOWNLOADS
निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मधील शिक्षण तुमच्या उज्वल भविष्यासाठी एक उत्तम गुंतवणूक.

मेंढ्यांचा कळप सर्वांनाच माहिती आहे, मेंढ्या एखाद्या कुरणात चरत बसतात, तिथेच झोपतात आणि तिथेच खात राहतात. समजा त्यांना एका कुरणातून दुसऱ्या कुरणात जायचे असेल तेव्हा बघा त्या एकमेकांच्या मागोमाग जात राहतात, तुम्हाला ह्याचे कारण माहिती आहे? हो बरोबर विचार केलात, मेंढ्यांना स्वतःची विचार करण्याची क्षमता नसते.

दुसऱ्या मेंढ्या जे करतात तेच इतर मेंढ्या करत राहतात. पण आपण माणूस आहोत, माणूस प्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असतो कारण त्याला स्वतःची विचार क्षमता असते, आपला एक वेगळा ठसा उमटवण्याची चालाखी असते, आणि त्यातही आपण इतर लोकांपेक्षा वेगळे आहोत हे सिद्ध करण्याची जिद्द असते.

आपला एखादा मित्र डॉक्टर होण्यासाठी एम.बी.बी.एस ला दाखला घेत आहे म्हणून आपणही तेच करणे हे चुकीचे आहे. प्रत्येकाने आवडी नुसार क्षेत्र निवडले पाहिजे जर काही जणांना अकाउंटिंग आणि कॉमर्स मध्ये जायचे असेल तर त्यांनी त्याच क्षेत्रात शिक्षण घेतले पाहिजे. B.Com आणि MBA Finance चे शिक्षण घेऊनही भरपूर युवकांना नोकरी मिळवण्यासाठी वणवण भटकताना पहिले आहे याचे प्रमुख म्हणजे Practical Knowledge चा अभाव, कृती द्वारे शिक्षण घेण्याचा चान्स मिळालाच नाही म्हणून ज्ञान, अनुभव & आत्मविश्वास या तीनही गीष्टींची पुर्ती झालीच नाही, पण निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स या संस्थेत व्यावहारिक ज्ञान आणि औद्योगिक प्रशिक्षणासह विद्यार्थ्यांच्या कृती द्वारे शिक्षणावर लक्ष दिले जाते मग कमी वेळात जास्त ज्ञान प्राप्त करण्याची संधी तर निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स या संस्थेने प्राप्त करून दिलीच आहे मग संधी सोडायला नको. निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स ह्या संस्थेमध्ये एका वर्षाच्या कालावधीचा कोर्स केला तरी MBA Finance पेक्षा जास्ती ज्ञान प्राप्त होते कारण ह्या संस्थेमध्ये आपल्याला शिकवल्या जाणाऱ्या कोर्सेस व्यतिरिक्त प्रॅक्टिकल स्किल, सॉफ्ट स्किल, पर्सनालिटी डेवलपमेंट, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, प्रत्येकासाठी स्वतंत्र कंप्यूटर, ऑडियो-वीडियो प्रत्यक्षिकांची उत्तम सोय, ध्यान-धारणेसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि इत्यादी सारख्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान दिले जाते पण निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये पुस्तकी ज्ञाना व्यतिरिक्त प्रॅक्टिकल ज्ञान देण्यावर जास्त भर आहे. कृती द्वारे विद्यार्थ्यांना शिकवलेले पटकन आणि सहजरित्या समजू शकते आणि चांगले शिक्षण मिळू शकते असा आमच्या संस्थेचा विश्वास आहे. ह्या संथेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र संगणक वापरायला मिळतो ज्यातून प्रत्येकाला कसून तयारी करता येते आणि प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करत येते.

टाय कसा बांधावा, कोणत्या कामासाठी कोणते कपडे कसे घालावेत, आत्मविश्वास कसा वाढवावा, व्यावहारिक जीवनात कसे वागावे यांसारख्या गोष्टी देखील शिकवल्या जातात. थोडक्यात सांगायचं झालं तर हि संस्था पालकांप्रमाणे विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असते.

कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर आधी पाया पक्का असायला हवा. व्यावहारिक जीवनात कसे वागावे आणि कसे बोलावे हे समजत नसेल तर मग आपण ध्येयपूर्ती कशी करणार? त्यामुळे व्यावहारिक जीवनात टिकून राहण्यासाठी प्राथमिक शिक्षण गरजेचे आहे.

निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स ह्या संस्थेचा एकदा जाणीवपूर्वक विचार करा आणि मुलांचा भविष्याचा विचार करून फक्त एकदा या शिक्षण संस्थेला भेट द्या किंवा ह्या संस्थेची चौकशी करा. तुमची प्रत्येक शंका दूर केली जाईल, तुमच्या मनातील काळजीचे समाधान केले जाईल. निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स या संस्थेमध्ये ऍडमिशन घ्यायला किंवा चौकशी करायला जाल तेव्हा या संस्थेची शिक्षण पद्धती नक्की पहा. तुमचा मुलगा, मुलगी, भाऊ किंवा बहिणीला देखील अश्या योग्य ठिकाणी शिक्षण मिळावे अशी इच्छा तुमच्या मनात जागृत होईल. आम्ही सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका, तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा तुम्हाला समाधान मिळेल.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये जेव्हा आपण ऍडमिशन घेतो तेव्हा आपणास स्टॅम्प पेपर वर लिहून दिले जाते की “जेव्हा तुम्ही निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मधून शिक्षण घेऊन बाहेर पडाल तेव्हा तुमच्या कडे नोकरी असेल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला १००% नोकरी देण्याची जबाबदारी निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स ची आहे”.

आपण शिक्षण संस्था, शिक्षण पद्धत, उत्तम सुख सुविधा या गोष्टीं बद्दल का बोलत आहोत? आपल्याला चांगले शिक्षण मिळावे आणि चांगली नोकरी मिळावी म्हणूनच ना? मग निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स हि संस्था तर उत्तम आहे शिक्षण आणि नोकरी या दोन्हींची जबाबदारी स्वीकारत आहे. या संस्थेत जे कोर्सेस शिकवले जातात त्या कोर्सेसची फी कोणीही सहजपणे भरू शकतो एवढीच आहे. साधारण गरीब कुटुंबातील मुले सुद्धा ह्या शैक्षणिक संस्थेत सहजपणे ऍडमिशन मिळवू शकतात. हि संस्था अनेक मुलांचे भविष्य घडवत आहे आणि घडवत राहील.