CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
icats
DOWNLOADS
CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
marathi-text
DOWNLOADS
निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये फक्त पुस्तकी ज्ञान न घेता प्रॅक्टिकल ज्ञान संपादन करा

आपण जेव्हा एखादे पुस्तक किंवा कादंबरी वाचतो तेव्हा त्या पुस्तकातील किंवा कादंबरीतील प्रत्येक गोष्ट आपल्याला समजत नाही कारण आपले मन हे चंचल आहे, आपण एखादे काम करत असताना सुद्धा आपल्या मनात वेगवेगळे विचार चालु असतात आणि आपण प्रत्येक गोष्ट करताना आपल्या मनात विचार चालुच असतात मग पुस्तक किंवा कादंबरी वाचताना सुद्धा मनात विचार येतातच ना.. पुस्तकातील मजकुर आणि मनातील विचारांचा गोंधळ होतो आणि आपल्याला पुर्ण मजकुर लक्षात राहत नाही.. पण आपण एखादा ऐतिहासिक किंवा इतर कोणताही चित्रपट पाहतो तेव्हा आपण मनात विचार करत नाही असं नाही पण पाहण्यात आणि वाचण्यात खुप जास्त फरक आहे.. आपण एखादी गोष्ट पाहत असतो तेव्हा आपण ती गोष्ट अनुभवत सुद्धा असतो आणि अनुभव सहज विसरता येत नाही.

शाळेत आपण जेव्हा विज्ञानाचे प्रयोग करायचो तेव्हा ते प्रयोग आपल्याला पटकन समजायचे पण जर हेच प्रयोग फक्त वाचले असते तर लक्षात आले नसते आणि लक्षात तर बिलकुल सुद्धा राहिले नसते.. कृतीतुन घडलेल्या गोष्टी समजतात आणि अनुभव देऊन जातात. या सर्व गोष्टींचा खोलवर विचार करून निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला कृतीतुन शिकण्याची संधी उपलब्ध आहे. या संस्थे मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या व्यावहारिक प्रशिक्षणावर जास्त भर दिला जातो, कृती द्वारे विद्यार्थ्यांना अनुभव सुद्धा मिळू शकतो आणि आपण काय शिकत आहोत हे पण पटकन समजु शकते.. कोणत्याही संस्थेचा हेतू एकच असतो तो म्हणजे शिक्षण चांगले दिले गेले पाहिजे पण असं घडत नाही, बर्‍याच शैक्षणिक संस्था जिथे फक्त शिक्षण देतात आणि आपली जबाबदारी संपली आसे वागतात, तेथे आमची निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स ही संस्था विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल शिक्षण देऊन एक उत्तम जीवन आणि स्किल्स निर्माण करून 100% नोकरी ची गॅरंटी देते.

विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आणि जी गोष्ट समजावून सांगितली आहे ती गोष्ट कृतीद्वारे/प्रॅक्टिकली समजावणे करून घेणे… अश्या दोन्ही पर्यायांचा अवलंब करणारी संस्था म्हणजेच.. “निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स” जिथे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकास आणि व्यावसायिक विकासाचे प्रशिक्षण दिले जाते आणि विद्यार्थ्याला प्रत्येक समस्येला सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवले जाते. दुनिया बदलत आहे आणि दुनियेबरोबर आपणही बदलत आहोत मग शिक्षण पद्धत पण बदलायला हवी ना.. अशी शिक्षण पद्धत जी विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणते.

जर निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समस्येचे निवारण होत आहे, एक सक्षम विद्यार्थी घडवला जात आहे, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकास आणि व्यावसायिक विकास चे प्रशिक्षण दिले आहे, विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले जात आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास केला जात आहे आणि या सर्व गोष्टी करून विद्यार्थ्याला नोकरी सुद्धा दिली जात आहे तर विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि ध्येयपुर्ती का होणार नाही…? निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट देत आहे जी एका विद्यार्थ्याला हवी असते मग या संस्थे मध्ये शिकणारा विद्यार्थी भविष्यात स्वतःला सिद्ध का करू शकणार नाही? अशी शंका देखील मनात येत नाही कारण इथे दिसते 100% यश आणि खात्री)

सर्वांच्या नजरेत असे एखादे उदाहरण असते ज्यामध्ये एका विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्याचे आई-वडील कष्ट करत असतात आणि मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण देण्यासाठी धडपडत असतात, आई-वडील काटकसर करून जेव्हा मुलाचे शिक्षण पुर्ण करतात तेव्हा तोच मुलगा नोकरीसाठी इकडून तिकडे हिंडत असतो… अशी उदाहरणे सर्वांना माहित आहेतच मग आपण शहाणे व्हायला नको का? निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये विद्यार्थ्यांना सर्व सुविधा, वैयक्तिक विकास, व्यावसायिक विकास, कृतीतुन शिकण्याची संधी आणि शिक्षण झाल्यावर नोकरी सुद्धा मिळत असेल तर आपण दुसऱ्या व्यक्तींच्या नजरेत वरील प्रमाणे एक उदाहरण म्हणुन तर नक्कीच राहणार नाही. होय.. तुम्ही एकदम बरोबर वाचले आहे.. निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये ऍडमिशन घेताना प्रत्येक विद्यार्थ्याला स्टॅम्प पेपर वर लिहुन दिले जाते कि या संस्थेतुन शिक्षण घेऊन बाहेर पडताना तुमच्या हातात नोकरी असेल आणि तुमच्या नोकरीची जबाबदारी निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स या संस्थेची असेल, आपल्या शिक्षणाकडे आणि शैक्षणिक सुविधांकडे तर निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स चे लक्ष असतेच याशिवाय आपल्याला १००% नोकरी मिळवुन देण्याची हमी सुद्धा निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स देते. त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता लगेच निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सला भेट दया आणि आपल्या मनातील सर्व शंकांचे निवारण करून लगेच प्रवेश घ्या.