CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
icats
DOWNLOADS
CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
marathi-text
DOWNLOADS
निलयामध्ये शिकण्याचा आनंद घ्या.

निलयामध्ये शिकण्याचा आनंद घ्या.

आनंदाचे डोही आनंद तरंग| आनंदची अंग आनंदाचे|| संत तुकारामाच्या अभंगातील या ओळी अगदी ठळकपणे आनंदमय वातावरण असणे किती आवश्यक असते याचे वर्णन करतात. शाळा किंवा कॉलेजमधील मुलांवर अभ्यासाचा खूप मोठ्या प्रमाणात ताण जाणवत आहे. त्यातच आईवडिलांच्या न संपणाऱ्या अपेक्षा मुलांना अगदी वैतागून सोडतात, आणि
पालक नको त्यापेक्षा जास्त आपल्या आयुष्यात इंटरफेअर करत आहेत ही शंका त्यांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता असते. आईवडिलांनी मुलांकडून अपेक्षाच करू नये असा अर्थ इथे अजिबात नाही, त्यापेक्षा त्यांना त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या आवडीनुसार, त्याहीपेक्षा असं म्हणूयात कि आईवडिलांनीच आपल्या मुलांच्या डेली रुटीनकडे लक्ष ठेवून आपल्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागते की नाही याची चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे. कॉलेज मध्ये होणाऱ्या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांवर खूप ताण येतो आणि एवढे करूनही जॉब मिळण्याची कुठलीही गॅरंटी नसेल तर यामुळे त्यांचा आत्मविश्वास नाहीसा होऊन त्यांच्या निराश होण्याची शक्यता जास्त असते.

शिक्षणासोबत एक आनंददायी वातावरण पण गरजेचे असते कारण अभ्यासाबरोबरच त्या गोष्टींना पण वेळ देणे गरजेचे आहे, ज्या करायला तुम्हाला आवडतात . शिक्षण केवळ घेऊन काही उपयोग नसतो पण ते घेताना तुम्हाला त्यात किती मजा येत आहे आणि त्याचा तुम्हाला खरच तुमच्या वैयक्तिक जीवनाला किती लाभ होतो आहे, हे पण खूप महत्वाचं असतं.

त्या आधी हे लक्षात आले पाहिजे कि त्या विद्यार्थ्याची काय आवड आहे आणि त्याची जी आवड आहे तेच त्यांनी कराव यावर भर देणं जास्त गरजेचे आहे. कारण असा पण आपण बघतो कि जर विद्यार्थ्याची आवड कॉमर्समध्ये असूनही तो विज्ञाना कडे वळतो कारण तिकडे संधी जास्त आहेत. पण पालकांनी हे जाणून घेणं अतिशय महत्वाचा आहे कि आपल्या मुलाला/ मुलीला नेमका काय आवडतं आहे आणि आपण त्याच्या त्या गोष्टीला कसा वाव देऊ शकतो आणि अश्या वेळी पालकांचा सहभाग खूप महत्वाचा ठरतो.

तुम्हाला काय आवडतं याचं विश्लेषण तुम्हालाच करावा लागेल, कारण इतरांचे सल्ले हे ज्यांच्या त्यांच्या दृष्टीकोनातून सुचविलेले असतात तो तुमचा दृष्टीकोन नसतो. त्यामुळे स्वतःच्या करिअरचा निर्णय तुम्हाला स्वतःलाच घ्यावा लागणार, त्यात नक्कीच तुम्ही इतरांचे सल्ले जाणवून घ्या कारण त्यात तुमची खूप मदत होईल. ज्ञानाचा विस्तार हा नेहमीच व्यक्तिगत आयुष्यासाठी आणि करियरसाठी मदतीचा ठरत असतो एवढे मात्र खरे.

आज कॉमर्स फिल्डमध्ये करीयरच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रा संबधीत अभ्यासक्रमाचे योग्य गाईडन्स मिळाला तर नक्कीच विद्यार्थ्यांच्या करियरला आकार मिळेल. पुण्यातील नामवंत इन्स्टिट्यूटनिलया आयकॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’ मध्ये अगदी आनंदमय वातावरणात विद्यार्थ्यांच्या करियरला आकार दिला जातो. इन्स्टिट्यूट तर बऱ्याच आहेत पण ‘निलया आयकॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’ची बातच न्यारी आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे शिक्षण घेतल्यानंतर जॉब मिळण्याची 100% गॅरंटी आहे अगदी बाँड पेपरवर. विद्यार्थ्यांना सतत तेच ते शिकविल्यामुळे शिक्षणात रटाळपणा येण्याची शक्यता असते त्यामुळे शैक्षणिक वातावरण आनंदमय होण्यासाठी इथे केवळ शिक्षणच दिले जात नाही तर त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी गॅदरींग्ज, वेगवेगळ्या इव्हेंट्स, कन्सर्ट आयोजित केल्या जातात. शिवाय अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एव्ही रूम्स आहेत. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इथे कसोसीने प्रयत्न केले जातात.

निलया आयकॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’ची विविध माध्यमांनी दखल घेतलेली आहे. दैनिक सकाळ, दैनिक पुढारी, दैनिक लोकमत या वृत्तपत्रांनीही आयकॅट्सने सुरु केलेल्या अभिनव उपक्रमाबबाबत आवर्जून लिहले आहे. झी २४ तास, साम टीव्ही या आघाडीच्या न्यूज चॅनल्सने आयकॅट्सने शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामांची मुलाखत घेऊन दखल घेतलेली आहे. ‘शिक्षणदूत’ ह्या पुरस्काराने आयकॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’ची

प्रतिष्ठा आणखीनच वाढली आहे. तर मग आता वाट कसली बघायची, लगेच आयकॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’ ला भेट द्या आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा.