आपल्या सर्वांच्याच आयुष्यात चढ-उतार हे येताच असतात. जेव्हा चढ येतो तेव्हा किती वेगाने चालायचं आणि उतार आल्यावर पळायचं कि ब्रेक लावायचा हे आपल्याच हातात असत. असे होत राहते कारण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असे नाही.
आपल्याला प्रत्येक समस्येला सामोरे जावे लागते. समस्येला पाठ दाखवून चालत नाही. आपण समस्येला सामोरे जाऊन कसे त्यातून बाहेर पडतो हे महत्वाचे आहे. आयुष्यात समस्या आल्यावर खचून जाणे म्हणजे त्या समस्येपासून पळ काढणे किंवा आयुष्याला कंटाळणे होय.
शोले चित्रपट सर्वानीच पहिला असेल. ह्या चित्रपटात एक डायलॉग आहे. “जो डर गया, समझो मर गया”, हे वाक्य आपल्याला खूप काही शिकवून जाते. पण शिकण्याची आणि समजून घेण्याची आवड असायला हवी. कोणत्याही समस्येला न घाबरता सामोरे गेलात तर यश नक्कीच आपले असेल.
सचिन तेंडुलकर हे नाव सर्वांनाच माहिती आहे. हे नाव जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या डोक्यात विचार येतो क्रिकेटचा. आज आपण जेव्हा क्रिकेट मॅच पाहतो तेव्हा सचिन तेंडुलकरची फलंदाजी आपल्याला आठवते. सचिन तेंडुलकर हे व्यक्तिमत्व एवढे नामांकित आहे कि क्रिकेट म्हणजे सचिन तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेट असे झाले आहे.
सचिन जेव्हा १६ वर्षाचा होता तेव्हा १५ नोव्हेंबर १९८९ ला पाकिस्तान मधील कराची येथे त्याने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ह्या सामन्यात सचिनच्या समोर ३ मोठी आव्हाने होती. ती म्हणजे वासिम अक्रम, इम्रान खान आणि वकार युनिस. ह्या सामन्यात सचिनने २४ बॉल मध्ये १५ धावा बनवल्या होत्या. पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याच्या इतक्या कमी धावा होत्या याचा अर्थ त्याने क्रिकेट खेळणे बंद केले का? सचिन प्रत्येक समस्येला सामोरे गेला, लढत राहिला म्हणूनच आज त्याला God of Cricket म्हणजेच क्रिकेट जगातील देव असं म्हणतात.
सचिन तेंडुलकरचं उदाहरण देण्याचा हेतू एवढाच आहे कि तो प्रत्येक समस्येला सामोरा गेला आणि त्याने यश प्राप्त केले. सचिन हा सुद्धा एका साधारण कुटुंबातून आला आहे. तो लढू शकतो, धावू शकतो, पडल्यानंतर परत उठू शकतो तर मग आपण का नाही ?
आजकाल आपण शाळा किवा कॉलेज मध्ये कमी मार्क्स मिळाले तरी खचून जातो. कमी मार्क्स मिळणे म्हणजे आयुष्य संपणे असं नाहीये. तुम्ही परत प्रयत्न करू शकता, परत अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवू शकता. शाळेत आणि इतर ठिकाणी आपल्याला “प्रयत्नांती परमेश्वर “ आणि “ तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” हि वाक्ये वाचायला मिळाली असतीलच. पण हि वाक्ये फक्त वाचून सोडून न देता आता तरी त्या सुविचारांचा अर्थ समजून घ्या.
आयुष्यात हरणे पण कधीतरी तितकेच महत्वाचे आहे. कारण हरल्याशिवाय जिंकण्याचे महत्व समजत नाही. पण नेहमीच हार पत्करावी लागत असेल तर सवय लागू न देता आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. आपण नेहमीच हरत असू तर त्याचा अर्थ असा होतो कि आपण चुका करत आहोत. मग या चुका शोधणे आणि चुका सुधारणे हे आपले काम आहे. चुका शोधताना आणि सुधारताना आपल्याला जे ज्ञान मिळेल ते ज्ञान कोणत्याच शाळेत किवा कॉलेज मध्ये मिळत नाही. परिस्थितीची आणि चुकांची शिकवण नेहमीच लक्षात राहते. पण परिस्थिती आणि चुकांमधून शिकण्यासाठी लढणे आवश्यक आहे.
जेव्हा आपण एखाद्या खेळामध्ये किंवा आयुष्यातील समस्यांना घाबरून हार मानतो तेव्हा आपण स्वतःला सांगत राहतो कि मी ह्या समस्येसाठी किंवा खेळासाठी तयार नाही. अश्या वेळेला आपला आत्मविश्वास वाढवणे खूप गरजेचे आहे. ‘होय मी हे करूनच दाखवणार’ अशी भावना जपणे गरजेचे आहे आणि हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एखाद्या अनुभवी माध्यमाची गरज आहे, हे माध्यम तुम्हाला मिळू शकते Nilaya ICATS येथे. हो आम्ही येथे भावनिक शक्तीला प्रबळ करण्यासाठी विशेष मदत करतो ज्यामध्ये योग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि चिंतन इत्यादी गोष्टींवर भर देतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास हा Nilaya ICATS ने घेतलेला आहे.
Nilaya ICATS येथे आपला सर्वांगीण विकास तर होईलच पण त्याबरोबरच तुम्हाला असा आत्मविश्वास मिळेल ज्यामुळे तुमचे भविष्य उज्ज्वल बनण्यास चालना मिळेल. आयुष्यातील कोणताही प्रसंग असो, त्याला खंबीरपणे तोंड द्यायची एक उमेद निर्माण होईल आणि ‘होय मी हे करूनच दाखवणार’ अशी हिम्मत निर्माण होईल.