CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
icats
DOWNLOADS
CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
marathi-text
DOWNLOADS
गृहिणींसाठी त्यांचे करिअर पुन्हा सुरू करण्याकरिता योग्य ठिकाण म्हणजेच निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री आघाडीवर आहे मग काही वैवाहिक स्त्रिया चुल आणि मुल या गुंत्यात का अडकल्या आहेत? नाना प्रकारचे दडपण घेऊन स्त्री कशी जगते इथपासून ते शरीर आणि मन यांच्यातील गोंधळ तसेच स्त्रियांवरील बंधने यांमध्ये स्त्री चेपली गेली आहे, स्त्रियांवर जी बंधने लादली आहेत त्या बंधनाचे पालन समाजाच्या समाधानासाठी करतात कि कुटुंबाच्या समाधानासाठी करतात हा प्रश्न अजुनही उलगडला नाहीये. या धावत्या युगात स्वार्थी लोकांची मनस्थिती अशी झाली आहे कि,.. कोण पुढे चालला आहे यापेक्षा जास्त कोण मागे राहतोय आणि कसा मागे राहतोय याकडे लोक लक्ष देत असतात पण सर्वांचा दृष्टिकोन आणि स्वार्थरूपी हेतु एकच असतो, तो म्हणजे मला पुढे जायचंय. मला सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचंय असा विचार कोणच करत नाहीये याउलट मी एकटा पुढे कसा जाईल या कोड्याचे उत्तर लोकांच्या मनात अडकले आहे. लोक कोड्यात अडकलेत कि कोडी लोकांमध्ये अडकली आहेत हे सांगणे जरा कठीणच आहे.. काही महिलांना तर या कोड्यातच जागा मिळत नाहीये. महिला चुल आणि मुल या गोष्टींमध्ये एवढ्या गुंतल्या आहेत कि हा गुंताच सुटत नाहीये.

स्त्री-पुरुष, उच्च-नीच यांच्यातील विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षणाचा पाया रोवून समता रुजविण्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांम्पत्याने मोठे योगदान दिले आहे,पण खरंच स्त्रियांच्या शिक्षणाचा फायदा होतोय का? एक बाप स्वतःच्या मुलीला उच्च शिक्षित करून तिचे लग्न करून सासरी पाठवतो, सासरी जाऊन त्या मुलीला चुल आणि मुल याच गोष्टी सांभाळाव्या लागत असतील तर मुलीच्या शिक्षणाचा काय उपयोग?

आजही समाजात पुरुषी मानसिकता वरचढ असल्याने म्हणावी तशी समता रुजलेली नाही. महिलांना अजुनही पुरुषांच्या आणि जुन्या चालीरितींच्या दडपणाखाली रहावे लागत आहे, स्त्रियांना स्व-हितासाठी आणि सन्मानाने जगण्यासाठी एक पाऊल उचलण्याचा गरज आहे, हि गरज भागवण्यासाठी निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स स्त्रियांना वाणिज्य क्षेत्रात पुढे घेऊन जाण्याचे काम करते, स्त्रियांना वाणिज्य क्षेत्रातील योग्य प्रकारचे मार्गदर्शन केले जाते, त्यांना स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून दिली जाते, मुख्य म्हणजे स्वतःची कारकीर्द घडवण्यासाठी मदत आणि प्रोत्साहन दिले जाते, स्वतःची कारकीर्द आणि क्षमतेची वाढ करण्यासाठी मदत केली जाते जेणेकरून स्त्रिया आजच उद्याच्या प्रश्नांची उत्तरेच काय तर उद्याचे प्रश्नच मुळासकट उपटून फेकु शकतील आणि स्वतःचे भविष्य स्वतः ठरवु शकतील..

निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये आजपर्यंत १००% विध्यार्थ्यांना यश प्राप्त झाले आहे आणि निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मधुन बाहेर पडलेली स्त्री पुरुषा प्रमाणे ऑफिस आणि घराची जबाबदारी खांद्यावर घेऊन स्वतःच्या पायावर खंबिरपणे उभी आहे.

निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मधुन बाहेर पडून बऱ्याच महिला यशस्वी होऊन करिअर करत आहेत आणि यातील काही यशस्वी महिलांचे उदाहरण म्हणजेच…

लीना टोतले

लीना टोतले यांच्या लग्नानंतर त्या ३-४ वर्षे काहीच करू शकल्या नाहीत पण त्यांनी निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स ची मदत घेतल्या नंतर त्यांना कोहिनूर ग्रुप ऑफ कंपनीज मधे काम मिळाले, निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स द्वारे मिळालेल्या कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर लीना टोतले आता वर्षाला ६.५ लाख रुपये कमावण्यासाठी सक्षम झाल्या आहेत, निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स द्वारे मिळालेले प्रोत्साहन आणि लीना टोतले यांचा कामाबद्दलच्या प्रामाणिकपणामुळे त्या फक्त २.५ वर्षात वित्त विभागाच्या प्रमुख बनल्या.

धनश्री घाडगे

निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स च्या सर्वोत्कृष्ट कौशल्यांमुळे धनश्री घाडगे आज आयसीआयसीआय बँक मध्ये काम करतात आणि वर्षाला ४ लाख रुपये कमवतात.

आयसीआयसीआय बँक सारख्या नामांकित बँक मध्ये धनश्री घाडगे Deputy Manager या पदावर काम करत आहेत.

वैशाली भांगे

निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स च्या सर्वोत्कृष्ट कौशल्य आणि प्रोत्साहनामुळे वैशाली भांगे L & T सारख्या मोठ्या आणि नामांकित कंपनी मध्ये काम करत आहेत. या कंपनी मध्ये जॉईन केल्यानंतर पहिल्याच महिन्यात “Employee of the month” या पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले.

या जगात सन्मानाने आणि ताठ मानेने वावरण्यासाठी महिलांनी Nilaya iCATS institute of Commerce ची मदत घेतलीच पाहिजे कारण, १००% जॉब मिळण्याची हमी आजकाल कोणीच देत नाही पण निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सचा स्वतःवरील विश्वास सर्वांना १००% जॉब मिळण्याची हमी देत आहे.

या शर्यतीच्या युगात पाय खेचणारे भरपुर सापडतील पण मदतीचा हात देणारे फक्त Nilaya iCATS institute of Commerce च आहे. त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता लगेच निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सला भेट दया आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा.