कॉमर्स मध्ये शिक्षण घेत आहात? आजही बऱ्याच वेळेला अनेक लोक मेडिकल आणि इंजिनिरिंग सारख्या क्षेत्रांची तुलना कॉमर्स क्षेत्राशी करतात आणि कॉमर्स क्षेत्राला कायम कमी समजतात. होय, हि आपल्या देशामधील एक दुर्देवी गोष्ट आहे, लोकांना असे वाटते कि ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल आणि इंजिनिरिंग मध्ये प्रवेश मिळत नाही तेच विद्यार्थी कॉमर्स क्षेत्र निवडतात आणि आज आम्ही तुम्हाला कॉमर्स क्षेत्रामधील काही गैरसमजुती ज्या लोकांच्या मनामध्ये आहेत त्या सांगणार आहोत.
चला तर मग पाहूया काय आहेत ह्या गैरसमजुती:
१. अभ्यासात कमकुवत असणारे विद्यार्थीच कॉमर्स चे शिक्षण घेतात.
कॉमर्स क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तेवढाच किंबहुना जास्त अभ्यास करावा लागतो जेवढा मेडिकल आणि इंजिनिरिंग मधल्या विद्यार्थ्यांना करावा लागतो कारण फायनान्स आणि इकॉनॉमी हि महत्वाची क्षेत्रे कॉमर्सशी निगडीत आहेत आणि हीच खरी परिस्थिती आहे कारण प्रत्येक क्षेत्रात अभ्यास आणि प्रात्यक्षिक गोष्टींचा अभाव असेल तर विद्यार्थी त्या क्षेत्रात पारंगत नाही होऊ शकणार.
२. कॉमर्स क्षेत्राला एवढी काही मागणी नाही.
दुसरी चुकीची गैरसमजूत, कॉमर्स क्षेत्रामुळेच तर व्यापार आणि व्यवसाय क्षेत्र झपाट्याने पुढे चालले आहे. कॉमर्स क्षेत्रातील जाणकार व्यक्तीच फक्त व्यावसायिक बाबींमध्ये लक्ष घालून व्यवसाय सांभाळू शकतात. पैसा आणि इतर व्यवसायाशी निगडीत गोष्टींच्या व्यवस्थापनात कॉमर्स मधील जाणकार व्यक्ती कामास येतात जे इतर क्षेत्रातील व्यक्ती क्वचितच करू शकतात.
३. CA, CS आणि ICWA सारखे कोर्सेस केले तरच कॉमर्सचा उपयोग होतो.
CA, CS आणि ICWA सारखे कोर्सेस केले म्हणजे उत्तम करियर घडते ह्यात काहीच शंका नाही पण हे कोर्सेस करत असताना यशाची हमी किती आहे ते बघणे जास्ती गरजेचे आहे. सर्वांनाच माहिती आहे कि ह्या कोर्सेस मध्ये प्रवेश घेणाऱ्या १०० विद्यार्थ्यांपैकी फक्त ५ ते ८ विद्यार्थीच फक्त उत्तमरीत्या हे कोर्सेस पूर्ण करू शकतात, पण बाकीच्या विद्यार्थ्यांना हे कोर्सेस पूर्ण करण्यासाठी बराच वेळ आणि पैसा दोन्ही बऱ्याच प्रमाणात खर्च करावा लागतो.
ह्या कोर्सेस शिवाय देखील कॉमर्स क्षेत्रात असे अनेक कोर्सेस आणि शिक्षणाच्या संधी आहेत ज्या तुम्हाला उत्तम करियर घडवण्यासाठी मदत करू शकतात.
कॉमर्स क्षेत्रामधील करियर म्हणजे एक उत्तम आणि आदर्श असे करियर आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या क्षेत्रात शिक्षण घ्यावे आणि उत्तम करियर संपादित करावे ह्यासाठी आम्ही Nilaya ICATS Institute of Commerce येथे अनेक उत्तम असे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी आखले आहेत. ह्या कोर्सेस मध्ये कॉमर्स मधील शिक्षण त्यांना कंटाळवाणे वाटत नाही उलट कॉमर्स मध्ये शिक्षण घेतोय ह्याचा अभिमान वाटतो कारण फक्त थेओरेटीकलच नव्हे तर जास्तीत जास्त प्रॅक्टिकल पद्धतीने आम्ही ह्या कोर्सेसची रचना केलेली आहे.
ह्या कोर्सेस मध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये सुरु असलेल्या नव-नवीन संधी आम्ही उपलब्ध करून देतो जसेकी इंटर्नशिप आणि ह्या गोष्टींशिवाय इंटरव्यूसाठी लागणाऱ्या उपयुक्त बाबी सुद्धा शिकवतो म्हणजे बॉडी-लँग्वेज कशी असावी, कॉर्पोरेट जगात वावरत असताना कश्या पद्धतीने कपडे परिधान करावेत तसेच अनेक साऱ्या बाबी आम्ही बारकाईने विद्यार्थ्यांकडून करवून घेतो.
व्यावसायिक शिक्षणासोबतच CA निलय सर जे Nilaya ICATS Institute of Commerce चे संस्थापक आहेत त्यांच्याकडून मिळणारे sacred lessons आणि इतर गोष्टी जसे की विद्यार्थ्यांच्या आवडत्या संगीत साधनांचा सराव, योग आणि मेडिटेशन ह्याची सोय इत्यादी. ह्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या पुणे येथील ४०,००० स्क्वे.फुटातील अद्यावत वास्तू मध्ये उपलब्ध करून देतो.
कोर्सेस बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही आमची वेबसाईट पाहू शकता: www.icats.co.in किंवा फोन करू शकता +९१-९७३०००५००० ह्या क्रमांकावर.