दिवसेंदिवस व्यापकरूप धारण करीत असलेली व्यवसाय निर्मिती भारताला महासत्ता बनविण्यासाठी नक्कीच पूरक बाब ठरणार आहे. किराणा दुकानापासून ते मोठ्या कारखान्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी कॉमर्स आवश्यक झाले आहे. त्यामुळे साहजिकच रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होत आहे. पूर्वी दहावी बारावीमध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले की विद्यार्थ्यांचा कल केवळ सायन्सकडे असायचा पण आता चित्र पलटत आहे. कॉमर्स हे एकमेव असे क्षेत्र आहे ज्यामध्ये मंदीचा कोणताही परिणाम जाणवत नाही. म्हणूनच कधी नव्हे ते इतके महत्त्व आज कॉमर्स क्षेत्राला प्राप्त झाले आहे. सरकार देखील शासकीय पातळीवर उद्योग उभारणी संदर्भात नवतरुणांना प्रोत्साहन देत आहे त्यामुळे या क्षेत्रात भविष्यामध्ये आणखीन झपाट्याने वाढ होणार हे निश्चित आहे. जॉब किंवा बिझनेस, क्षेत्र कोणतेही असो ते यशस्वी करण्यासाठी कॉमर्समध्ये निपुण असणे हे अपरिहार्य झाले आहे. मार्कशीट पेपरवरील आकडा वाढला म्हणजे आपण हुशार झालो असे जर तुम्ही समजत असाल तर ती तुमची सगळ्यात मोठी घोडचूक ठरू शकते कारण शिक्षणाची खरी परीक्षा आपल्याला जीवन जगत असतांना द्यावयाची असते आणि म्हणून आपण काय आणि कुठे शिकलो याला महत्व प्राप्त होते. सध्याच्या काळात गुणवत्तापूर्ण शिक्षण असणे ही काळाची गरज बनली आहे कारण याच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या आधारे आपण पुढील आव्हाने पेलणार असतो. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात आणि त्या जोडीला तितकेच कुशल मार्गदर्शनही हवे असते. निपुणता ही दर्जेदार शिक्षणातून प्राप्त होते आणि दर्जेदार शिक्षण मिळविण्यासाठी चौकस बुद्धी हवी असते कारण आजच्या काळात शिक्षणक्षेत्रामध्ये प्रचंड चढाओढ निर्माण झाली आहे. वारेमाप शैक्षणिक जाहिरातीमुळे नेमके शिक्षण कुठे घ्यावे यासंदर्भात विद्यार्थी कमालीचा मेटाकुटीला आलेला आहे आणि असे असतांना देखील एक चांगला कोर्स आणि चांगले इन्स्टिट्यूट निवडणे देखील खूप मोठी गोष्ट आहे. दहावी, बारावी पास केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर खरे आव्हान असते ते योग्य कोर्स निवडण्याची, कारण हीच त्यांच्या आयुष्याची पहिली पायरी असते आणि ती पायरी भक्कम करण्या साठी प्रंचंड प्रमाणात मेहनत करावी लागते. आणि तुमच्या आयुष्याची हि महत्वाची पायरी चढायला पुण्यातील एक नामवंत इन्स्टिट्यूट…अर्थात ‘निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’, तुम्हाला नक्कीच मदत करेल, होय इथेच अगदी नि:संकोचपणे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळेल यात तिळमात्र शंका नाही.
वित्तीय संस्था, बँका व विमा कंपन्यानी जागतिकीकरणामुळे आपापला व्यवसाय सातासमुद्रापार नेऊन ठेवला आहे त्यामुळे कॉमर्समध्ये निपुण असणाऱ्यांची अशा कंपन्यांना नितांत गरज भासत आहेत. CA, CS, CMA, अशा कितीतरी संधी निर्माण होत आहे. कॉमर्स क्षेत्रातील संधी खुणावत असताना तरुणांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी सदैव तयार असणे अत्यंत आवश्यक आहे.
‘ निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’ मध्ये अत्यंत प्रभावीपणे कॉमर्स क्षेत्रातील अभ्यासक्रम शिकविले जातात आणि याची दखल विविध माध्यमांनी घेतलेली आहे. दैनिक सकाळ वृत्तपत्र लिहते की ‘निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’ हे शिक्षण क्षेत्रातील एक नामवंत नाव आहे. दैनिक पुढारी, दैनिक लोकमतही आय-कॅट्स बद्दल आवर्जून लिहितात. झी २४ तास, साम टीव्ही या आघाडीच्या न्यूज चॅनल्सने आय-कॅट्सने शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामांची मुलाखत घेऊन दखल घेतलेली आहे. ‘शिक्षणदूत’ हा मानाचा पुरस्कार तर निश्चितच आय-कॅट्सच्या प्रतिष्ठेला ‘चार चाँद’ लाऊन जातो. एखाद्या जॉब साठी १७ पेक्षा जास्त MBA च्या विद्यार्थ्यांना रिजेक्ट करून आय-कॅट्सचे BCOM विद्यार्थी सिलेक्ट होत असतील तर ही खूप मोठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना MBA करून देखील जॉब मिळाला नसतांना आय-कॅट्सच्या प्रभावी कोर्सद्वारे अनेकांना जॉब मिळाल्याचे कित्येक उदाहरणे आहेत आणि हीच बाब आय-कॅट्सचे यश अधोरेखित करते. त्यामुळे आय-कॅट्सच विद्यार्थ्यांची पहिली पसंती असेल यात अजिबात शंका नाही. कोर्स आणि इतर अधिक माहितीसाठी प्रत्यक्षपणे एकदा आय-कॅट्सलाला भेट द्याच.