CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
icats
DOWNLOADS
CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
marathi-text
DOWNLOADS
एमबीए पलीकडे विचार करा – निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये आज च प्रवेश निश्चित करा.

अनेक वेळा दुसऱ्याचे अनुकरण करून त्यात आपला फायदा होईलच असे नाही, कारण बऱ्याच वेळा असे होते कि आपल्याला अपेक्षित फायदा होत नाही आणि केलेले अनुकरण चुकीचे झाले आहे असे वाटते.

शैक्षणिक क्षेत्रात अनुकरण करण्याचा मूर्खपणा नेहमीच होतो. मित्र किवा मैत्रिणीने Engineering, MBA किवा MBBS ला ऍडमिशन घेतले म्हणजे आपण सुद्धा त्याच क्षेत्रात जायला हवे असे नाही. पण विद्यार्थ्यांना नेमके हेच समजत नाही. एकाने MBA ला ऍडमिशन घेतले कि सर्वजण त्याच्या मागे पळतात. मित्र आणि मैत्रिणीच्या पाठोपाठ आपण ऍडमिशन घेतो. कदाचित पास पण होतो पण त्यानंतर काय ? त्यानंतर नोकरीसाठी हातामध्ये फाईल घेऊन वणवण फिरावं लागत. बऱ्याचदा आपण आपल्या आवडीच्या विरोधातील काम करत राहतो पण जर खरंच तुमची आवड त्या कामात नसेल तर आपण कधीच १००% निष्ठेने ते काम करू शकणार नाही आणि आपल्याला अपयश पत्करावे लागते.

ह्याचबरोबर आपण ह्या साठी लागणारा खर्च पाहू,आजकाल खाजगी संस्थेतून MBA शिक्षण घेण्यासाठी २-३ वर्षे तर लागतातच तसेच कमीतकमी ८ लाख रुपये लागतात , आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरुवातीला अपेक्षित पगाराची नोकरी मिळेलच असे नाही, मग MBA करणाऱ्यांनी शिक्षणाचा खर्च कधी भरून काढायचा ? आयुष्य कधी जगायचे ? सेटल कधी व्हायचे?

एखाद्याचे अनुकरण करून MBA सारखी डिग्री प्राप्त करण्यापेक्षा स्वतःच्या इच्छेनुसार शिक्षण घेणे काही वाईट आहे का ? धीरूभाई अंबानी, बिल गेट्स यांनी MBA चे शिक्षण घेतले होते का ? पण त्यांनी त्यांच्या आवडीने एवढे मोठे बिझनेस उभे केलेच ना.. म्हणूनच तुम्हाला जर तुमचे स्वप्नातले विश्व उभे करायचे असेल तर स्वतःमध्ये सामर्थ्य निर्माण करावे लागेल आणि हे काम हाती घेतलय निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सने.MBA Finance पेक्षा Faster, Smarter आणि Affordable असा एक कोर्स उपलब्ध केला आहे तो म्हणजे CAFM . जो फक्त एका वर्षाच्या कालावधीचा आहे. सर्वसामान्य लोक सहजरीत्या हा कोर्स पूर्ण करतील अशी ह्या कोर्सची फी पण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल अशीच आहे.

कॉमर्स क्षेत्राशी निगडीत विविध कोर्सेस एकत्रित पणे शिकवण्यासाठी निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स प्रयत्न करत आहे आणि या प्रयत्नांना यश सुद्धा मिळाले आहे. निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये CAM आणि CAFM सारखे कोर्स शिकवत आहे आणि हे कोर्स करणारे विद्यार्थी MBA शिकलेल्या विद्यार्थ्यांना मात देवून निरनिराळ्या क्षेत्रात नोकरी मिळवत आहेत. म्हणूनच या कोर्सला Faster, Better & Affordable Than MBA असेही म्हणतात.

आमच्याकडील कोर्सेसमधील शिक्षण हे MBA पेक्षा प्रभावी आणि प्रचंड अद्यावत आहे, हे आम्ही वारंवार सिद्ध करून दिलेले आहे आणि त्याचे अगदीच ताजे उदाहरण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना UNION BANK OF SWITZERLAND माहिती आहे, हि जगातील नामवंत बँकांपैकी एक बँक आहे. Nilaya ICATS मधील कोर्सेसची माहिती ह्या बँकेला एक दिवस समजली आणि त्या दिवसापासून आपल्या येथील Campus Drive मधून हि बँक दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांना उत्तम पगाराची नोकरी देते. मागच्या वर्षी म्हणजेच २०१७ साली ह्या बँकेत अनेक विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी अर्ज दाखल केलेले, बहुतांशी विद्यार्थी MBA Finance पास होते परंतु सर्वात जास्त जागा ह्या ‘Nilaya ICATS’ च्या विद्यार्थ्यांनी पटकावल्या असे विद्यार्थी ज्यांनी MBA Finance पूर्ण नाही, किंवा MBA Finance केले नव्हते. ह्याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांचा झालेला सर्वांगीण विकास आणि कॉमर्स क्षेत्रातील सखोल ज्ञान हेच होय!

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे आणि शैक्षणिक सुविधांकडे तर निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स चे लक्ष असतेच, या शिवाय या संस्थेची शिक्षण पद्धत जरा वेगळी आहे. या संस्थे मध्ये विद्यार्थ्यांना प्रेक्टीकॅल द्वारे मिळणाऱ्या ज्ञानाला प्राधान्य दिले जाते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या संस्थेमध्ये शिकल्यानंतर १००%नोकरीची हमी दिली जाते. १००% नोकरी मिळेल याचा पुरावा म्हणून स्टॅम्प पेपर वर लिहून दिले जाते. तर वाट काय पाहता एमबीए पलीकडे विचार करा आणि निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स मध्ये आज च प्रवेश निश्चित करा