CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
icats
DOWNLOADS
CALL:
+91 97300 05000
ENQUIRY FORM
marathi-text
DOWNLOADS
एका वर्षात फायनान्स मॅनेजर व्हा.

आता फायनान्स मॅनेजर होणे अगदी सोपे
ICATS फायनान्स क्षेत्रामध्ये करीअर घडवा.
फायनान्स मॅनेजर व्हायचंय? ICATS आहे ना.
ICATS सोबतीने फायनान्स क्षेत्रामध्ये करीअर घडवा
फायनान्स क्षेत्रामध्ये करीअरच्या असंख्य संधी.

विद्यार्थी मित्रांनो, मराठी मध्ये एक म्हण आहे की, ‘जे विकतं ते पिकवावं’ नाहीतर नुकसानीस तयार राहावे अगदी हेच तत्व तंतोतंत शैक्षणिक क्षेत्रातही लागू होते. काही वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की अगदी सहज जरी विचारले की, दहावी बारावी नंतर काय करणार, तरी बऱ्याच विद्यार्थ्यांचे उत्तर जवळपास एकसारखेच असायचे डॉक्टर किंवा इंजिनीअर, नाहीच काही झाले तर किमान शिक्षक तरी होणारच. ग्रामीण भागातील परिस्थिती सुद्धा अशीच आहे आणि मग इथेही अर्थशास्त्राचा मागणी आणि पुरवठा सिद्धांत लागू होतोच. ज्या विशिष्ट क्षेत्रामध्ये विद्यार्थांचा मोठ्या प्रमाणात कल होता त्याच क्षेत्रातील युवकांवर आज मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. ज्या हातांनी लेखणी धरली त्याच हातांवर टिकम,कुदळ, फावडे धरण्याची वेळ येत असेल तर तो शिक्षणाचा दोष नाही तर आपण निवडलेल्या क्षेत्राचा आहे. उच्च शिक्षण घेऊन जर बेरोजगारीचा सामना करावा लागत असेल तर आता वेळ आली आहे असा कोर्स निवडण्याची जो तुम्हाला लगेच जॉब देऊ शकेल. तुमच्यात क्षमता असेल आणि तुम्हाला खरोखरच डॉक्टर, इंजिनीअर किंवा शिक्षक व्हायचे असेल तर नक्की व्हा, पण इच्छा नसतांना एखाद्या क्षेत्राकडे सगळेच जाताहेत म्हणून तुम्हीही त्या क्षेत्राकडे वळत असाल तर हा तुमच्यासाठी चुकीचा निर्णय ठरू शकतो असे म्हणायला हरकत नाही. सध्या कॉमर्स क्षेत्रामध्ये रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध झालेल्या आहेत. कॉमर्समध्ये असे काही कोर्सेस आहेत की जे यशस्वीपणे पूर्ण केल्यास शंभर टक्के जॉब लागण्याची हमी असते. पुण्यातील आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’(ICATS Institute of Commerce) मध्ये तर अगदी बाँड पेपरवर जॉब लागण्याची हमी देण्यात येते त्यामुळे विद्यार्थ्यांनी असे जॉब पूरक कोर्सेस करायला हवेत.

कोणत्याही व्यवसायाला यशाची उंच शिखरे गाठायचे असल्यास त्या व्यवसायाचे मॅनेजमेंट खूप प्रभावशाली असणे आवश्यक असते. व्यवसाय छोटा असो किंवा मोठा असो व्यवसायामध्ये आर्थिक व्यवहार होत असतात आणि हे व्यवहार व्यवस्थित संभाळण्यासाठी प्रत्येक कंपनीमध्ये किंवा उद्योग, व्यवसायामध्ये फायनान्स मॅनेजरची आवश्यकता असते त्यामुळे भविष्यामध्ये फायनान्स मॅनेजर म्हणून तुम्ही स्वत:कडे बघत असाल तर नक्कीच तुम्ही योग्य दिशेने जात आहात. पुणे येथील आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’(ICATS Institute of Commerce) मध्ये फायनान्स मॅनेजमेंट संदर्भात जॉब ओरिएटेंड कोर्सेस शिकविले जाते त्यामुळे विद्यार्थांना जॉब लागण्याची शंभर टक्के शाश्वती असते. जर आय-कॅट्सच्या C.A.F.M. कोर्स पूर्ण करून विद्यार्थ्यांना उत्तम जॉब मिळत असेल तर M.B.A. चा अट्टाहास कशासाठी ? होय अगदी M.B.A. च्या तोडीस तोड असा हा C.A.F.M. (Master In Corporate Accounts & Finance) कोर्स आहे आणि तो पुण्याच्या आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’ मध्ये उत्तमरीत्या शिकविला जातो.

१ वर्ष कालावधीच्या या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना दररोज ५ तास शिकविले जाते म्हणजेच जवळपास १४०० तासांचा हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर शंभर टक्के वार्षिक दहा लक्ष रुपये पॅकेज असलेला जॉब मिळू शकतो. ह्या कोर्सेमुळे विविध बँका, वित्तीय संस्था, शेअर मार्केट, इत्यादी ठिकाणी जॉब मिळण्याच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झालेल्या आहेत. विद्यार्थी जॉबसाठी उत्सुक नसेल तर व्यावसायिकरित्या C.A. ची प्रॅक्टीस करू शकतात. जर स्वतः व्यवसाय करणार असाल तर ह्या कोर्सचा व्यवसाय व्यवस्थापनासाठी खूप मदत होऊ शकते.

कॉमर्स ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ज्या विद्यार्थ्यांनी MBA पूर्ण केले आहे किंवा करताहेत असे विद्यार्थी हा कोर्स पूर्ण करू शकतात त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे वडिलोपार्जित व्यवसाय आहे असे विद्यार्थी देखील हा कोर्स करू शकतात. गृहिणी सुद्धा हा कोर्स करून प्रगती साधू शकतात.

या लेखातील C.A.F.M, C.A. फायनान्स, बँक, शेअर मार्केट इत्यादी शब्द वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपले क्षेत्र तर कॉमर्स नाही आता आपल्याला एवढा चांगला कोर्स करता येणार नाही, तर मित्रांनो अजिबात निराश होऊ नका हा कोर्स नॉन कॉमर्स ग्रॅज्युएट विद्यार्थीसुद्धा करू शकतात. तेंव्हा आजच निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स’ ला भेट द्या, हा कोर्स जॉईन करा आणि फायनान्स मॅनेजर बनून आपले करिअर घडवा.