शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक व्यक्ती नोकरीच्या शोधात भटकू लागते. काही जणांना नोकरी मिळते पण काही जणांना नोकरी मिळण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होतात आणि निराशा पत्करावी लागते. काही जणांचा निर्णय पक्का असतो की त्यांना नोकरी करायची नाहीये. अश्या लोकांच्या मनात आधीपासूनच व्यवसाय करायचे विचार चालू असतात.
पूर्णपणे विचार करून एखादा व्यवसाय चालू करणे आणि त्या मधून नफा प्राप्त करणे ह्या गोष्टींचे ज्ञान ज्यांच्या कडे असते त्यांना उद्योजक असे म्हणतात. कोणताही उद्योग करायचा म्हटले की त्या मध्ये उतार चढाव हे येतच राहतात. ह्या चढ-उतारा मध्ये उद्योजकांना थकून चालत नाही. त्यांना तोट्यातून स्वतःला सावरुन नफा कसा प्राप्त करता येईल ह्याचा विचार करावा लागतो आणि लक्ष देऊन काम करावे लागते.
काही उद्योजक कमी काळातच त्यांचा उद्योग-धंदा बंद करतात आणि परत नोकरीच्या शोधात भटकू लागतात. त्यामुळे प्रत्येक उद्योजकाकडे संयम आणि स्वतःवर विश्वास असायला हवा, जो काम करायची क्षमता वाढवतो. उद्योजक छोटा असो किंवा मोठा त्याला अकाउंटिंग तसेच फायनान्स आणि GST चे ज्ञान असलेच पाहिजे. व्यवसायामध्ये जर तोटा होत असेल तर त्याला नफ्यात कसे बदलायचे हे उद्योजकाला समजले पाहिजे. ह्यांसारख्या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो आणि ह्या प्रत्येक गोष्टींचे गणित डोक्यात ठेवावे लागते. त्यामुळे उद्योजकाला अकाउंटिंग तसेच फायनान्स आणि GST चे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे.
कोणताही उद्योजक जेव्हा एखादा व्यवसाय किंवा उद्योग सुरु करतो तेव्हा देखील खूप गोष्टींचा विचार करावा लागतो, मार्केट मध्ये कोणत्या गोष्टीची मागणी आहे? त्या गोष्टीच्या व्यापारामध्ये नफा आहे का? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात तसेच उद्योग सुरु केल्यावर अनेक प्रकारचे कर भरावे लागतात.
जसेकी:
इत्यादिंसारखे कर उद्योजकांना भरावे लागतात. प्रत्येक कर भरताना हा कर आपण का भरतो आहे आणि हा कर खरंच भरण्याची गरज आहे का? जर भरला नाही तर काय होऊ शकते? अश्या प्रकारची माहिती प्रत्येक उद्योजकाला असलीच पाहिजे. त्यामुळे उद्योग कोणताही असो अकाउंटिंग तसेच फायनान्स आणि GST चे ज्ञान हे कामी पडते.
अकाउंटिंग तसेच फायनान्स आणि GST मध्ये करिअर बनवणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आणि उद्योजकांसाठी या सर्व गोष्टी किती महत्वाचे आहे हि गोष्ट लक्षात घेऊन निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स या संस्थेने कॉमर्स आणि अकाउंटिंगच्या संबंधित कोर्सेस शिकवायला सुरुवात केली आहे. या संस्थेमध्ये CAFM आणि CAM सारखे कोर्सेस शिकवले जातात. ह्या कोर्सेस मध्ये पुढील गोष्टी शिकवल्या जातात.
· अॅडव्हान्स फायनान्स
· उद्योजकता कौशल्ये बिझनेस स्किल्स
· अॅडव्हान्स अकाउंटिंग
· डायरेक्ट कर डायरेक्ट टॅक्स
· बँकिंग
· आर्थिक व्यवस्थापन फायनान्शियल मॅनॅजमेन्ट
· प्रकल्प वित्तपुरवठा प्रोजेक्ट फायनान्सिंग
· Basic Financing बेसिक फायनान्सिंग
· अप्रत्यक्ष कर इंडिरेक्ट टॅक्सेस
· इन्शुरन्स आणि शेअर मार्केट इन्शुरन्स अँड शेयर मार्केट
· आर्थिक व्यवहार्य प्रकल्प इकॉनॉमिकली वॆबल प्रोजेक्ट्स
· सुरक्षा विश्लेषण सेक्युरिटी अनालसिस
· खाते आणि कार्यालय व्यवस्थापन अकाउंट्स अँड ऑफिस मॅनॅजमेन्ट
· व्यक्तिगत विकास आणि जीवनशैली शुद्धीकरण पर्सनालिटी डेव्हलपमेंट
· ई-कॉमर्स
· ई-बँकिंग
· पेरोल
इत्यादीं सारख्या गोष्टी डिटेल मध्ये शिकवल्या जातात .
निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स या संस्थेत शिकवले जाणारे प्रत्येक कोर्सेस सर्व विद्यार्थी किंवा उद्योजक सहजपणे शिकू शकतात.
अकाउंटिंग , फायनान्स आणि टॅक्सेशन हे फक्त पुस्तकातून शिकता येणारे विषय नाहीयेत. अकाउंटिंग शिकण्यासाठी प्रॅक्टिकल ज्ञानाची खूप गरज आहे. फक्त पुस्तकी ज्ञान मिळवून स्वतःला स्मार्ट म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिकल ज्ञान घेऊन स्वतःला सिद्ध करणे गरजेचे आहे आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स या संस्थेतून प्रॅक्टिकल ज्ञान घेणे आवश्यक आहे. आपण स्वतः एखादे काम जेव्हा कृती द्वारे पूर्ण करतो तेव्हा आपणाला त्या कामाबद्दल जास्त ज्ञान प्राप्त होते & अनुभव व कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो तसेच आपल्या मध्ये जी भीती असते त्या भीतीचे आत्मविश्वासात रूपांतर होते, मुख्य म्हणजे निलया आय-कॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स या संस्थेत कृतीं द्वारे शिक्षणावर भर दिला जातो.